#वाडाचिरेबंदी १
ऱातकिड्यांची किरकिर खूपच जास्त ऐकू येत होती. पडवी शेजारी खाली गाद्या घालून सगळे झोपले होते. उन्हाळ्याचे दिवस होते .. अजून चंद्रोदय व्हायचा होता. घरात आक्रीत घडल होत. सगळे जागे होते तरी सगळे झोपल्याच सोंग घेऊन होते. दाजी, आक्का, माई , दादासाहेब आणि दाजीचा मित्र शंकर सगळेच आपल्या जागी तळमळत होते. आयुष्याने भलतेच वळण घेतले होते.. आणि त्याला काही इलाज नव्हता. मार्ग निघणार नव्हताच .. अब्रूचे लक्तर टांगल्या जाण्यापेक्षा मरण बर असा विचार आक्का च्या मनात हजारदा येऊन गेला.
मिणमिणे कंदील खांबाला लटकत होते. काचेच्या पेटीच झुंबर होत. सगळ्या भिंतीना देवाच्या तसबिरी लागलेल्या होत्या. एकीकडे टिळक , गोखले आगरकरांच्या तसबिरी होत्या. अंधार दाटला होता. कुठेतरी कुत्रे केकाटत होते
वाड्याचा दरवाजा दोन्ही मोठ्याला कड्या घालून म्हादबाने मघाशीच बंद केला होता. आज जेवण म्हणजे नुसते anन चिवडले होते सगळ्यानीं. ह्या घराला आपल्या मुळे लागलेल ग्रहण कस सुटेल हे आक्का ला समजत नव्हते. रडून रडूम तिचे डोळे लाल झाले होते. माई तिची समजूत काढायला कमी पडत होत्या . दादासाहेबांसमोर त्यांच काहीच चालत नसे. दाजी आक्का पेक्षा लहान तो काय बोलणार घरातल्या विषयात?
आक्का चुळबुळ करत होती. उठली ... माझघराजवळच्या खोलीत आली. तिथला कंदील उचलून तिनी आरश्यात पाहीले. वळून स्वत:ची पाठ पहायचा प्रयत्न केलां. पण अंधारात काही दिसेना.. तिने मुठी समोरच्या भिंतीवर आदळल्या. अतिशय असहाय्य होती ती.. तिचे जगण्यावर प्रेम होते. स्वत:च्या लांबसडक केसांवर प्रेम होते. गोऱ्या रंगावर प्रेम होते. आणि तिचे जगण्यावर प्रेम होते. आयुष्याकडून खूप स्वप्न होते तिचें. आणि ह्या सगळ्या स्वप्नाना दंश लागला होता भुजंगाचा. तिच आयुष्य विषवृक्ष बनत जात होते. त्याच्या फांद्या छाटल्या नाहीत तर तो अख्ख्या कुलकर्णी कुटुंबाला घातक ठरेल. एकुलता एक वारस असलेला दाजी ... त्याच लग्न होणार नाही. वंश वाढणार नाही. वंशवृक्ष खंडेल... त्यापेक्षा मुळापासून ही विषवल्ली कापायला हवी... मी संपायला हवे ... आक्काच्या मनात परत आत्महत्त्येचा विचार आला. कंदीलातले तेल संपत आले होते. काच काळा व्हायला लागला. अंधार अजूनच गडद होत होता. रात्र किर्र कुरकुरतच होती. आशेचा एकही किरण सापडत नव्हता. काही तरी चमत्कार होईल आणि आलेले संकट टळेल असा आक्का सतत विचार करत होती. पण अस काहीच झाल नाही. ह्या महिन्याभरात आज ताण जास्त वाढला होता. आणि आक्कानी निर्णय घेतला.
तिनी आपला पदर खोचला. जड अंत:करणाने एकेक पाऊल टाकत ती त्या खोलीबाहेर आली.. पडवीला डोळे फुटले अस तिला वाटलें. आठ डोळे ... तिची नजर बारीक झाली. तिनी वेध घेतला अंधाराचा ... कोणी तिला अडवायच्या आधी तिला जायचे होते. पण कोणीच अडवणार नाही हे पण माहीती होते. डबडबलेले डोळे पुसत तिनी पडवीच्या दाराची कडी न वाजवता काढली. कदाचीत आवज झाला ओअण पडवीला झोपेच्या सोंगातून बागेर निघायचे नव्हतें. तिच्या जिवाची लाही लाही झाली... तिला जगायचे होते. तिनी कपाळावर बुक्क्या मारून घेतल्या .. हातातली बांगडी वाढली.. तिच्या कपाळाला लागली. खोच पडून रक्त यायला लागले
तिनी पडवीच दार बाहेरून लावून घेतल.. परसदारात आली... विहीरीकडे पहाताच पोटात सर्रकन गोळा आला. पण आता तिच्या इतकी सुरक्षीत जागा जगात कुठेच नाही हे तिला aअता पुरेपूर कळून चुकले होते. आजवर सुरक्षीत वाटणाऱ्या ह्या घरानी गेल्या काहीच दिवसात जीव नकोसा केला होता. ती विहीरीच्या पाळीवर बसली. आतला थंड अंधार तिच्या काळजात भितीची लहर सोडत होता.. त्यातून कुणी आवाज देत आहे अस तिला वाटल... आसरा असतील का त्या? उद्या मी नाहीशी झालेली दिसल्यावर हे घर किती हादरेल ह्या विचारने तिला असुरी आनंद झाला. असच तडफडेल हे सगळ घर.. ह्या माझ्याच घरानी माझ्याच माणसानी मला जीव नकोसा केला ... मला सुखात जगू दिल नाही सुखात मरू देत नाहीय... हे घर सुखी कस होईल?
ह्या विचाराना झटकायला तिनी मान झटकली.. जोरात झटक्याने तिचा तोल गेला... विहीरीच्या थंड अंधारात तिची किंचाळी भिनली...तिचे डोके भिंतीवर आदळले.. रक्ताचा फवारा उडाला. पाणी हातभर वर उसळले. तिचा देह तळाशी जात होता. पाण्याच्या धप्पकन्न आवाजा सोबत रातकिड्यांची किरकिर थांबली.
घरातल्या झोपेतल्या सोंगांनी जागच्या जागी हुंदके दिले... घर मुसमुसायला लागल.. जागच्या जागी तसच थिजून झोपेच सोंग वठवत राहील. सकाळ होणार होतीच ...
पण ती वेगळी असणार होती.
क्रमश:
गायत्री ..
..........................................................
#वाडाचिरेबंदी२
सकाळ झाली. आक्का घरात नव्हती. घराचे दार आतून बंद होते. तरी त्या झोपलेल्या पडवीने सहळ्या गावात आक्काचा शोध घेतला. सगळे व्यवहार अगदी रोजसारखे सुरू होते. पूर्ण दिवस गावभर शोधण्यात आणि विचारपुस करण्यात गेला...
माई यंत्रवत उठल्या. निर्जीव डोळे.. सुन्न हालचाली. पुतळ्यासारखे स्तब्ध दादासाहेब आणि सैरभैर झालेला दाजी ... त्याच्या सोबत मुग गिळून बसलेला शंकर..
स्नान संध्या ... पूजा सगळे आन्हीक यथासांग झाले. फक्त अन्न आजही वाट पहात होते. खांबाला सुन्न टेकून बसलेल्या माई एकटक समोरच्या दारातून दिसणाऱ्या विहीरीकडे बघत होत्या.
संध्याकाळी प्रेत फुगून वर आल. ओरडाआरड करत दादासाहेबानी गाव गोळा केल. शेजार पाजारचे लोक धावत आले. सगळ घर माणसानी गजबजल.. कुणीतरी विहीरीत उडी मारली तिघा चौघानी मिळून आक्का ला बाहेर काढल.. तिच प्रेत बाहेर आल्याबरोबर दादासाहेबानी नी धावत जाऊन तिचा पदर तिच्या पाठीवरून पूर्ण झाकला. मग त्याना तिच फाटलेल डोक, वेदनेनी विदीर्ण झालेला चेहरा आणि सताड उघडे असलेले डोळे दिसले... त्यानी भेदरून किंकाळी फोडली.
माई अजूनही खांबाला टेकूनच बसल्या होत्या. दाजी नी हंबरडा फोडला.. आक्काला वाचवता आल असत का? आपण का बांगड्या भरल्या सारखो चूप राहीलो? त्यानी हातानी कपाळ बडवून घेतल.
शेजारच्या काकूनी माईना खांद्याला हलवून हलवून शुध्दीवर आणल.. माईना संदर्भ लागेना. त्यांच्या जाणीवा जाग्याच होत नव्हत्या.
माई उठल्या .. सगळ्याना वाटल त्या आक्काला कवटाळून आता धाय मोकलून रडतील. पण त्या देवघरात गेल्या तिथे उंबरठ्यावर बसून त्यानी आपल्या ओटीपोटात बुक्क्या मारून घेतल्या. डोळ्यातून टिपूस नव्हते.. आणि पापणी लवत नव्हती..
माईनी रडायला हव नाहीतर त्यांच्या मनावर परिणाम होईल अस काशीकाकू दाजी जवळ बोलल्या. दाजी उठून माईंजवळ गेला. माईंच्या खांद्याला हात लावला. माईनी अनोळखी नजरेनी त्याच्या कडे पाहील.
दाजी चरकला. दोन पावल मागे सरकला. माई तितक्याच शांतपणे उठल्या आणि देवघरातून त्यानी देवीचा टाक उचलला... तो घेऊन त्या आक्का जवळ गेल्या. आक्काच्या चेहऱ्याकडे एकही नजर न टाकता त्या विहिरीजवळ गेल्या. तो टाक त्यानी विहिरीत टाकला आणि आक्का जवळ येऊन बसल्या. एकही टिपूस त्यानी गाळल नाही.. तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाल्या सुखाने जा...
क्रमश:
गायत्री
.....................................................
#वाडाचिरेबंदी३
१:( नलिनी)
आठ दिवसांवर लग्न आलेले. घरात प्रत्येकाची धावपळ सुरू होती. येताजाता घरात तसाच मजूर माणसांचा राबता असायचा. पाहुणे यायला लागले होते.. प्रत्येक खोलीत लग्नाच्या साम्याच सामान पडलेल होत. कालच मावशी मामी आल्या. मामा उद्या तर मामे भावंड अगदी अदल्या दिवशी येणार होते. आज आईने मुहुर्त धरला. गावातल्या ११ सवाष्णी जेवायला घातल्या. मावशी मामी आई आणि दोघी काकू मिळून सुपात चुली घातल्या. मुगवड्या घातल्या. हळद कांडली. खल बत्त्याची पूजा केली. सवाष्णीना रितसर वस्त्र आणि वायन दिले. प्रत्येकीला पायाला हात लाऊन नमस्कार करायला सांगितला आईने आणि मी केलाही.. तोंडभरून आशीर्वाद मिळाले.
आज अहेराच्या पुड्यांवर नाव टाकायचे होते. मी आमच्या म्हणजे माझ्या आणि शालिनी च्या खोलीत आले. साक्षगंधाच्या फोटोचा अलबम घेऊन पलंगावर बसले. खिडकीतून संध्याकाळचा सोनेरी प्रकाश येत होता. बासुंदीचे जड जेवण केल्याने माझे डोळे लागत होते. पण वर येताना दिसल्या बरोबरच आईची सुचना झाली होती की तिन्हीसान्हेची झोपू नकोस. तरी डोळे लागतच होते.
घरातल्या प्रत्येक खोलीत आत्त्याआजी आणि पद्माकाकूचा फोटो होता. आज त्या प्रत्येक खोलीतल्या फोटोला हार घातला होता. गंध फूल लाऊन पुजा केली होती. आत्या आजी तरूण पणीच गेली होती आणि पद्मा काकू म्हणे बाळंतपणात. तिच बाळ तिच्या माहेरीच होत. त्या फोटोंकडे पहाता पहाता मला अस जाणवल की आत्याआजी अगदी नजर खोचून पहाते आहे. मला लग्न ठरल्या पासून हे सतत जाणवत होत. मला नेहनीच तिच्या डोळ्यात जिवंतपणा जाणवतो. पण आजकाल नजर बोचल्या सारखी होती. दाजी नेहमीच म्हणायचे की मी आक्का सारखी दिसते. आत्या आजीच लग्न का झाल नव्हत ते नाही माहीत पण ऐन लग्नाच्या वयात तिनी वाड्यातल्याच विहीरीत जीव दिला होता. घरात तिचा विषय कोणीच काढत नसे. आत्या आजी नंतर ह्या घरातली जन्माला आलेली मी मुलगी. मागची पूर्ण पिढी फक्त मुलच जन्माला आले होते. घरी येणार्या एखाद्या वयस्कर व्यक्ती कडून नकळत आक्का आणि दाजी असा विषय निघायचा तो ही क्वचीतच. माझ लग्न ठरल्या पासून दाजी मात्र खूपच काळजीत असल्या सारखे वाटायला लागले होते. बैठकीत असलेल्या आत्या आजीच्या फोटोकडे टक लाऊन बसलेले असायचे. कितीदा त्यांचे डोळे गढूळायचे. काय रहस्य होत ह्या सगळ्या मागे ते कळत नव्हत.. खूप काहीतरी ह्या वाड्याने आपल्या चिरेबंदी भिंतींमद्गे दडवल होत..
आत्या आजी नाहीशी झाल्यावर दिवस भर शोधाशोध केली. संध्याकाळी तिच फुगलेल प्रेत बागेर काढल. चाळीस फूट खोल विहीरीत तिने जीव दिला. ऱहाटाची बादली झप्पकन सुटली तर पाण्याचा किती मोठा आवाज होतो. मग आत्या आजी ने जीव दिला तर घराला जाग कशी नव्हती? घर का चिडीचूप होत? आणि अजूनही आहेच? काय लपवतात दाजी. कोणत रहस्य आत्या आजी सोबत ह्या विहिरीत दबल? गावात रहाणारी जेमतेम अक्षर ओळख असलेली आत्या आजीबाहेर तर कुठेच जाण शक्य नव्हत. मग दिसेनाशी झाल्यावर घरातल्या विहीरीत कुणीच डोकावून पाहील नसेल?
दाजी किंव्हा त्याच्या आई बाबाना शंका नसेल आली?
जीव कोणी एका क्षणाच्या तिरीमिरीत नक्कीच देत नाही. आत्या आजीच्या मनात काय सुरू असेल तेंव्हा?
त्याच विहीरीच्या पाण्याने स्नान संध्या केली असेल. देव धुतले असतील. पाणी प्यायले असतील.
गावभर दबकत दबकत तिचा शोध घेतला असेल. ती नाहीशी होणार ही खात्री होती का त्यांना? प्रेत बाहेर आल्यावर सुतक पाळले असेल. गावभर तिच्या मरणाची चर्चा झाली असेलच न? कोणाला ना कोणाला नक्कीच माहीती असेल ह्या बद्दल. कुठेतरी नक्कीच पाणी मुरत. तिचा आणि काकूचा फोटो काय म्हणून प्रत्येक खोलीत? काका तर वेडसर आहे.त्याला काय फरक पडणार? हा देखावा कश्यासाठी?
मी परत त्या दोघींचे फोटो पाहीले. आत्या आजी छद्मी हसते आहे अस मला वाटल. तिच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलतात अस मला नेहमी का वाटत? मला एकदम तिच्या चेहऱ्या कडे पहाण्याची भिती वाटायला लागली. पण माझी तिच्या डोळ्यात रुतलेली नजर निघता निघत नव्हती. जणू एक सम्मोहन मला खेचत होते.. अंगभर एक शिरशिरी मला भेदत होती.
क्रमश:
गायत्री
....................................................
#वाडाचिरेबंदी४
नलिनी (२)
सुन्न नजरेने खिळून ते फोटो मी बघत बसलेली असताना लहान काकू खोलीत आलेली मला कळालेच नाही. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी दचकले. मला खूप घाम सुटला होता. कावरा बावरा झालेला चेहरा पाहून ती घाबरली.
" काय ग ए नले, काय झाल? कसला विचार करते आहेस? आणि फोटोत काय पहाते इतक टक लाऊन? तिन्ही सांजा होत आल्या अंधारात काय बसलीस? चल शिंपीण आलीय तुझे ब्लाऊज घेऊन. ते घालून बघ."
" अं .. हो .. काकू आत्या आजीने आत्महत्त्या का केली होती?"
धाडकन तिच्या अंगावर आदळलेला प्रश्न तिच्या मेंदू पर्यंत पोचायला काही सेकंद वेळ गेला. तिचा चेहरा अजूनच पडला.
" का ग? भलत्या वेळेस कसले विचार करत बसलीस? आणि तुला काय करायचय? आठ दिवसांवर लग्न आले. हे काय मुर्खासारखे विचार करत बसलीस? आधीच घर सोडून जायच्या विचाराने मन हळव झालेल असत. त्यात तिन्ही सांजेची एकटी बसलीस. चल आधी खाली."
मी तिचा हात घट्ट धरला. भयंकर भिती माझ्या मनात दाटली होती. तळवा घामाने पचपचला होता. थरथरत होता.
" काकू, आजी माझ्याकडे सतत रोखून बघते अस मला वाटत रहात. तिचे डोळे सतत माझा पाठलाग करतात. त्यातही साक्षगंध झाल्या पासून जास्तच. दारात मांडव पडला तेंव्हा पासून अस वाटत की ती आस पास आहे. मला खूप...."
काकूनी माझ्या ओठावर बोट ठेवल. तिचा चेहरा खर्रकन उतरला. भेदरल्या नजरेनी तिनी आत्याआजीच्या फोटोकडे पाहील. माझ्या चेहरा आपल्या पोटाशी घेतला. माझ्या केसातून हात फिरवत ती वक्रतुंड महाकाय पुटपुटायला लागली.
ह्या काकूचा माझ्यावर विशेष जीव. तिला मुलबाळ झाल नाही. आतड्यातली सगळी माया आमच्या वर ओतलीं. त्यातही माझ्यात जास्त जीव अडकलेला. पण आईने तिला आमच्याशी जास्त जवळीकेनी कधी राहूच दिल नाही. घरात वाद खूप क्वचीत व्हायचे. पण एकदा रागाच्या भरात आई तिला वंझोटी म्हणून गेली होती. आईला नंतर आपलीच चुक कळाली होती. पण मान्य केली नव्हती. काकूला कळत होत की तिच आमच्या जवळ जास्ती वावरण आईला आवडत नाही. ती पण आजकाल अंतर ठेऊन माया उधळायची.
मुकाट आपले काम करणारी ही काकू एखाद्याच वेळेस खूप चिडायची बोलायची. पण तिला संताप सुध्दा निट व्यक्त करता येत नव्हता. ती थरथर कापायची बोलताना. तिची बोबडी वळायची. आपल्याला काय म्हणायचे हे तिला कधीच सांगता आले नाही. आणि तिचा संताप व्यक्त झाल्या नंतर ओठ घट्ट मिटून घरभर वावरायची. कोणाशीच कधी मनमोकळ बोलताना मी तिला ऐकल नव्हत. लहाना काकासुध्दा स्वभावाने घुमट होता. त्या नवरा बायकोत सुध्दा कधी संवाद नसायचा.
काकूच्या डोळ्यातून दोन थेंब ओघळले. माझ्या कपाळावर सांडले.
"चल तिन्ही सांजेची ह्या नंतर खोलीत एकटी बसू नकोस. शालीनी कुठे गेलीय? तिला सांगाव लागेल सतत तुझ्या सोबत रहायला."
तुटक तुटक हे वाक्य म्हणत आत्या आजीच्या चेहऱ्याकडे बघत तिनी माझ्या हाताला धरून मला दाराकडे आणल. दारामागे असलेले सगळे लाईटचे बटन तिनी सुरू करून दिले. दार ओढून घेतल. जणू आत्या आजीला तिथे कोंडल असा सुटकेचा भाव तिच्या चेहऱ्यावर आला. माझा हात धरून ती भराभरा जिना उतरायला लागली.
जिना उतरल की मोकळ्या अंगणाचा चौक. त्या अंगणाच्या चारी बाजूनी खोल्या आणि चारी कोपऱ्यात जिने. वर तितक्याच खोल्या. पुर्वेच्या बाजूनी बाहेर जायचा दरवाजा. तिथून दहा बारा फूट जागा सोडून वाड्याच्या भोवताल दगडी कुंपण. मागच्या बाजूला जनावरांचा गोठा आणि चारा. उजव्या बाजूला तिन चार लहान लहान घर. घरातले गडी माणस तिथे रहायचे.
पूर्वेच्या दारालगत बैठकीचा सोपा. तिथे गाद्या त्यावर पांढर्या स्वच्छा चादरी; भिंतीला टेकून तक्के; आणि एक डेस्क. त्याला कुलूप असायच आणि तिथे दाजी हिशोब बघायचे फक्त.
जिन्यातून उतरल्यावर एका कोपऱ्यात स्वयंपाक घर. त्याला लागून बायकांची उठाबसायची खोली. घरात चुकूनच कधी निवांतपणा मिळाला की बायका त्या खोलीत आराम करायच्या. चौकात इतक्यातच पांढऱ्या फरश्या बसवल्या. त्यामुळे पावसाळ्यातला चिख्खल कमी व्हायला लागला. वर्हांड्याला चारी बाजूने चार चार पायऱ्या. ज्याला घराची ठेवण माहीती असेल तिच व्यक्ती बरोबर हव त्या खोलीत जाऊ शकायची. नवीन व्यक्ती बिचकून जायची.
बायकांच्या बैठकीत शिंपीण माझे ब्लाऊज घेऊन बसली होती. खरतर मला खूप इच्छा होती लग्नाचा बस्ता मुम्बई तून तयार करावा ब्लाऊज तिथे शिवावे पण घरून विरोध झाला आणि मी चूप बसले.
क्रमश:
गायत्री
................................................
#वाडाचिरेबंदी५
नलिनी (३)
संजय काका बाबांच्या पाठीवर पाय देऊन आला. त्याचा डावा पाय अधू होता. तो लंगडत चालायचा.त्यामुळे त्यांची झोपायची खोली खालीच होती. सुमती काकूने मला तिच्या खोलीत नेले ब्लाऊज घालून बघायला. सुमती काकू संजय काकाला दोन मुल. प्रदीप आणि प्रज्ञा. त्यातही अख्ख्या पाच भावंडांच्या कुटूंबात तिला एकटीलाच मुलगा असल्याने ताठ्याने वागायची.तिने प्रदिपला मुंबई ला ठेवल होत शिकायला. आणि प्रज्ञाला पण पाठवायच्या गोष्टी करायची. माझे साधे ब्लाऊज मला मुंबईला शिवू दिले नव्हते. पण तिच्या ह्या विचाराला दाजी हो म्हणत नव्हते पण नकारही देत नव्हते. मी आणि शालीनी इथेच शिकलो ग्रॅज्युएट झालो. तेंव्हा दाजी म्हणाले होते की काय करायच मुलीच्या जातीला इतक शिकून? रांधा वाढा उष्टी काढा. संसार करा तो वाढवा. आणि हे ज्ञान बाईच्या जातीला उपजत असत. शिक्षणाने ते येत नाही. प्रदिपच्या नावाची खोली वर होती ती एकटी प्रज्ञा वापरायची.
आत्या आजी गेली तेंव्हा दाजी किती वर्षांचे असतील? मी आणि प्रदिप इतक अंतर असेल का? मला माझ्या जागी आत्या आजी जाणवायला लागली. मी एकटक त्या ब्लाऊज कडे बघत होते. सुमती काकूनी मला आवाज दिला. भानावर येत मी ब्लाऊज घालून बघीतले. ब्लाऊज जरा घट्ट झाले.
" तिला एकेक शिवण वाढवायला सांगावी लागेल. तसच तर लग्ना नंतर सगळा बदल शरीरात होतो. आधीच तू जरा भरल्या अंगाची आहेस. नंतर त्रास होण्यापेक्षा जरा सैल करून माग"
काकूच बोलण मला विचित्र वाटल. प्रज्ञा अतिशय रोड होती. मी ब्लाऊज घालून पहात असताना काकूची नजर माझ्या छातीकडे लागलेली मला जाणवली. तिच्या चेहऱ्यावर माझ्या बांध्याचा हिरस दिसत होता. आईला वांझोटी विद्याकाकू नकोशी व्हायची पण हिरसेल सुमती काकूशी मात्र ती कायम नमत घ्यायची.मी पटकन पदराने स्वत:ला झाकले. तिने नजर वळवली आणि एक सुस्कारा टाकला. मी भराभरा ब्लाऊज च्या घड्या घातल्या.
शिंपीण ब्लाऊज उद्या आणते सांगून गेली. मी स्वयंपाक घरात डोकावून बघितले. विद्याकाकू खाली मान घालून नारळ खवत होती. आणि आई भाजणी भाजत होती. खमंग वास सुटला होता घरभर. मी पाट टाकून विद्या काकू जवळ बसले.
" बघितलेस का घालून? कसे बसले? कुठे ठेवलेस?" आईने विचारले.
" अग आई जरा तंग झाले. तिला परत दिले सैल करायला."
" अग पण, आता केंव्हा आणेल ती? माया नव्हती का त्याला? घरच्या घरी उसवता आली असती न शिवण. बॅगेत जायला हव आता एकेक सामान. आठ दिवस तर उरले."
आई चा आवाज कातर झाला. डोळे डबडबले. ह्या पंधरा दिवसात सतत असच होत होते.
" उद्या आणते आहे ती. मग मी आणि शालीनी मिळून व्यवस्थीत बॅग भरू. तू चिंता नको करू.. ए काकू दे ना ग एक तुकडा खोबऱ्याचा."
" नाही नाही. उद्या चतुर्थी आहे न त्याची तयारी करतेय ती. ती मागते आणि तू देते काय? इतके वर्षात तुला समजल नाही का की मोदकाच्या सारणाच खोबर उष्ट व्हायला नको म्हणून? उद्या मोदक खा तू."
काकूनी परत खाली मान घातली आणि खोबर खवायला लागली. तिच्या हाताबरोबर तिच्या बांगड्या मागे पुढे होत होत्या. त्याचा किणकिण आवाज होत होता. ती आई कडे चोरट्या नजरेनी बघत होती. आई आता वळून मागे बघणार नाही ही खात्री झाल्यावर तिने खोबऱ्याचा एक तुकडा चटकन काढला आणि माझ्या हातात सरकवला. डोळ्यानी खूण केली बाहेर जाऊन खा म्हणून.
" बाई नलिने उद्या मामा येईल. आज मुहुर्त झाला. आता तू घराबाहेर पडू नकोस. ",,
"अग पण आई, मला माझ काही सामान आणायच राहील आहे न."
" असू दे शालीनीला सांग ती आणून देईल."
" अहो पण वहिनी मुहुर्त झाला म्हणून काय झाल? अजून हळद लागायची आहे. देवदेवकाच कंकण बांधल की नका पडू देऊ तिला घराबाहेर."
" इतक काय सामान राहील आहे पण?"
" आहे न ग. थोड मेकअपच सामान आणि आतले कपडे वगैरे."
" हं जा. पण दिवसा उजेडी जा आणि लवकर परत ये. शालीनी सोबत जा. नाहीतर सुमती ला ने. तिला तशीही बाहेरच्या कामाताली चांगली समज आहे. मुम्बई ला जाऊन जाऊन वस्तु आणत रहाते तिलाच का नाही सांगितलस?"
" आई तू अतिरेकच करते सगळा. आतले घालायचे कपडे तिला आणायला सांगू का? आधीच तर ..."
मी वाक्य अर्धवट सोडून जीभ चावली. आई मागे वळून माझ्याकडे बघत म्हणाली
" आधीच तर काय?"
" काही नाही."
मी तटकन विषय तोडला. कारण ती माझ्याकडे कशी पहाते हे सांगुनही आईला खर वाटल नसत. माझ्या तळव्यात खोबऱ्याचा तुकडा घामेजत होता.
" तू चलतेस का मग आई? नाहीतर विद्याकाकू तू चल."
" इथे कोण उजेड पाडेल मग? विद्याला नेल तर मला एकटीला सुचत नाही. तुला शालीनी सोबत जायच आहे न जाऊन ये. "
मी उठून बाहेर आले. दाराशीच असताना आईच वाक्य ऐकायला आल.
" विद्या, आत्त्याबाई नंतर जगलेली ही पहिली मुलगी आहे. दाजींच्या चारही मुली रात्रीतून तडकाफडकी गेल्या. म्हणून हिच लग्न होई पर्यंत खूप जप अस दाजीनी सांगितलेल आहे. तू काय फूस लावते तिला बाहेर जा म्हणून?"
मी स्तब्ध झाले. बाबाना बहिणी होत्या हे सुध्दा मला आजच समजत होत. विद्या काकू नेहमीप्रमाणे निमूट होती. मला मघाच्या प्रसंगाचा विसर पडला होता. ते डोळे आठवून परत एक काटा सर्रकन अंगभर पसरला.

No comments:
Post a Comment