Monday, 15 July 2019


दाजी (१) 

ती भयाण रात्र मागे टाकत आयुष्य पुढे सरकणार होतच आणि ते सरकल.  आज ह्या वळणावर , जेंव्हा ह्या कुळातल्या तिन पिढ्यातल्या मुलीच माझ्या पहिल्या वहिल्या नातीच लग्न आठ दिवसांवर येऊन ठेपलेल असताना माझ्या मनाच्या समाधानाचा पेला काठोकाठ का वहात नाहीय? माझे मुल सुना नातवंड एकत्र कुटुंबात आहेत. मी सुखी माणसाचा सदरा घालून वावरतो आहे. अजूनही व्यवहार माझ्याच हातात आहेत. माझ्याच मर्जीनी सगळ घडत आहे. तरी मन सतत धास्तवलेल आहे.  हे लग्न पार पडून नलूबाई आपल्या घरी गेल्या की एका शापातून हा चिरेबंदी वाडा मुक्त होणार होता.


आक्का काल स्वप्नात दिसली. भेसूर हसत होती. नलिनीच्या चेहऱ्याच्या जागी ती दिसत होती. हिरवा शालू नेसून हिरवा चुडा घालून तिनी विहिरीत उडी मारली. आक्काला अग्नी दिला पण अखेरपर्यंत तिच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही.  तिच्या मागोमाग माईनी जीव सोडला. आका गेल्यावर अक्षरश: माईनी खंगून खंगून जीव सोडला. शेवटचे आठ दिवस  तर पाण्याचा थेंब नाही. सतत कुठल्यातरी तंद्रीत असायची. खांबाला टेकून बसली रहायची. नंतर नंतर ती आक्काशी बोलायची. बोलता बोलता रडायची. फडाफडा गालात मारून घ्यायची. माफ कर लेकरा माफ कर लेकरा अशी बडबड करत तिनी त्या विहीरीकडे पहात खांबाजवळच जीव सोडला. आक्का  गेली. सव्वा महिन्यात  माई गेली आणि वाडा अनाथ झाला.  

आक्काच्या पिंडाला शेवटी दर्भाचा कावळा लावला. दादासाहेब अपराधी पणाच्या ओझ्याखाली वाचा हरवून बसले. त्या काळात मी कसा जगलो आणि आयुष्य पुढे सरकवल हे आठवल की आजही अंगावर काटा  येतो. 

जीवाचा नुसता थरकाप होतो. नलिनी खूप निरागस आहे. तिच्या आयुष्यात फक्त सुख दे देवा. आक्कानी काल स्वप्नात येवून मला डावा कौल दिला. मुंडावळ्या बांधलेली आक्का विहिरीतून बाहेर येतेय ... दरदरून  घाम सुटला आणि जाग आली. आठ दिवसांवर लग्न आलेल,आणि नलिनी मात्र उदासवाणी वाटली आज. लेकरू खूप संयमी  आहे. कुठेही उथळपणा नाही.  मोठ्यांच्या   इच्छेला सतत मान देते. तिची इच्छा होती मुंबईला जाऊन लग्नाची तयारी करायची. पण मी नाही म्हणल. तिला साक्षगंधानंतर  होणाऱ्या नवऱ्याला एकदा तरी भेटावस वाटल असेल. पण मी  नकार दिला. इतक्या पिढ्यात लग्नाला उभी झालेली ह्या कुळातली पहिली मुलगी. आणि तिच्या नंतर मुली जगल्या. त्यामुळे नलिनीच्या सुखाला कोणाचीच दृष्ट लागू नये म्हणून मी तिला तिच्या छोट्या छोट्या इच्छाना  सतत मोडता घालतो. मला वाटणारा आनंद आणि समाधान मी जराही चेहऱ्यावर दिसू देत नाही  ते केवळ नलिनी सुखी व्हावी म्हणून. एकदा ती लग्न होऊन ह्या घराबाहेर पडली की हा पूर्ण वाडा शापमुक्त होणार होता. 

 मला  झोप लागेना. मी  बाहेर आलो  चौकातला पाळणा हलतो आहे का अस मला  वाटल. कड्यांचा  कुचकुच आवाज कानात आला. मला  आजकाल कमी दिसायच. मी  डोळे बारीक करून पाहील. कोणीतरी तिथे बसलेल होत.


भितीचा गोळा पोटात आला माझ्या. मी थरथर कापत पाळण्या जवळ आलो. 

"कोण?"    खूप दुरून आल्यासारखा माझा आवाज आला.

ती विद्या होती. सटकन उभी झाली. 

" दाजी, मला झोप नव्हती लागत. म्हणून ..."

" अग पण मध्यरात्री अस बाहेर एकटीने येऊन बसायची काय गरज? "


" मला खोलीत घुसमटल्या सारख झाल आणि तिथे मला जास्त भिती वाटते."

" भिती? कश्याची?"


ती काही न बोलता  खाली मान घालून उभी राहीली.

" बर जा आता आत. उद्या परत लवकर उठायच आहे. मांडव पडेल बाहेर. पाहुणे येतील. आणि तू तर मालतीचा उजवा हात आहेस...  त्यातही   नलिनी च लग्न. तू नलिनीवर किती जीव लावलेला आहे ते माहीती आहे मला. नलिनीच लग्न ..."

माझा गळा भरून आला..

विद्या नी पण डोळे  पुसले. ती निघाली. जाताजाता थांबली.

" दाजी, आज नलिनी खूप घाबरली होती संध्याकाळी."

" का?" 

" तिला आत्त्याबाईंच्या डोळ्यांची भिती वाटते म्हणे.  मलाही ते डोळे सतत पाठलागावर असल्या सारखे वाटतात... म्हणून मला खोलीपेक्षा इथे बसायला बर वाटत."

 एका श्वासात  बोलून विद्या थांबली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्याची भिती वाटत होती ते समोर येऊन उभ झाल. 

" मी आत्ता तिच्या जवळ झोपायपा जाणार होते. पण वहिनीना आवडत नाही.. आणि तिला जाताना दु:ख व्हायला नको कसलच. "

माझ्या कानात काहीही शिरत नव्हत.. काहीतरी करायला हव होत. येणार गंडांतर टळायलाच हव होत. काय कराव मला काही कळत नव्हत.  

" दाजी, दाजी.. काय झाल? किती घाम सुटला तुम्हाला? चला आत तुम्ही आधी. मग मी जाते."

ह्या लेकरानी पण खूप जीव लावला होता. मूक पणे सेवा करत रहाणे जणू तिचा धर्म होता.

" मी जातो. तू झोप आता. मी ठिक आहे.

" दाजी , आत्त्याबाईनी आत्महत्त्या का केली होती? आणि नलिनीला त्या का दिसत असतील?"


तिच्या प्रश्नानी मी दचकलो. पण हा प्रश्न इतक्या उघडपणे पहिल्यांदाच मला कोणी विचारला होता. आणि आता त्याच उत्तर कदाचीत पुढे येणार होत. विनाशाच वादळ घोंघावत दारात येऊन उभ झालेल होत. 


क्रमश: 

गायत्री ...

Tuesday, 9 July 2019


विद्याकाकू (२)

मालती वहिनींच्या माहेरीपण असेच ऐश्वर्य. जमीन जुमला होत. त्या तिकडे पण मोठ्या आनि इकडे पण मोठ्या. मोठेपणाची आणि तो मिरवायची एक झिंग त्याना चढली होती. सगळ काही मि च करेल. स्वयंपाक घर चोवीस तास मिच सांभाळेल. आलागेला मिच पाहील. शेताच्या हिशोबात सुध्दा त्या बरीच ढवळाढवळ करायच्या. शेतमालाचा पैसा प्रत्यक्ष कोणाच्याच हाती येत नव्हता. दाजी, माधव भाऊजी आणि हे अस तिघ मिळून बॅंकेत अकाऊंट होते. तिघांच्या सहीशिवाय पैसा निघत नसे. आणि दाजीनी अजूनही कर्ते पण सोडलेले नव्हतेप्रत्येक गोष्ट त्यांच्या सल्ल्यानी आणि हिशोबानीच व्हायची. नलिनीच लग्न हा पूर्णपणे दाजींचाच निर्णय होता. मुलगा बघण्यापासून ते दागदागीने घडविण्या पर्यंत दाजींच्याच इच्छेला मान दिल्या गेला होता. माधव भाऊजी सतत काहीतरी विचारात असतात अस मला वाटत रहायच. मालती वहिनींचा फटकळ स्वभाव, दाजींची मार्जी सांभाळण मुलीच लग्न ठरल तरी निर्णयाचा अधिकार नसण ह्या गोष्टींचा ते विचार करतात का असा मी विचार करायची. 

ह्यांचा तर प्रश्नच नव्हता. त्याना काही मत असेल अस मला वाटतच नाहीअगदीच अबोल स्वभाव. घुमट पणाकडे  झुकणारा.  त्यात आम्हाला मुलबाळ न झाल्याने एक पडते पणाच सावट सतत आमच्यात असायच. मनावर ओझ घेऊन आम्ही वावरायचो. दोष कोणातच नव्हता पण आमचा योग नव्हता. ते स्वत: कधी खळखळून हसले नाही त्यामुळे हळूहळू मी पण हसण विसरत गेले. आणि आता हरवून बसले. बोलून बोलू तर कोणाशी? नलिनी शालिनेव अगदी काळजा जवळ पण वहिनीना आवडत नव्हत त्यानी जास्त काकू काकू केलेल. कधीतरी मला रागाच्या भरात वांझोटी म्हणून वहिनी मोकळ्या झाल्या होत्या. त्याना माझ मन किती दुखावल ह्याची जाणीव नसेल पण मी ह्या जन्मात ते विसरू शकणार नाहीय. आत्ताही टचकन डोळे भरून आले माझे.  आता नलिनीच लग्न होत आहे. उद्या जाऊन ह्या मुलींवर अशी वेळ आली तर? ह्या तिला वांझोटी म्हणून हिणवतील का? 


जागच्या जागी दचकले मी. मुलींसाठी माझ्या मनात असे विचार आलेच कसे?  मी फाडकन स्वत: च्या गालात मारून घेतल.


घरात धान्याच्या गोण्या येऊन पडायच्या.माझ माहेर यथातथा असूनही माहेरी जाताना कधी चार दाणे तू माहेरी नेतेस का असा प्रश्न इतके वर्षात एकदाही आला नव्हता.  पण सुमती वहिनी मात्र दरवेळेस धान्य न्यायच्या. वास्तवीक मुंबईत धान्य साठवायला जागा नसायचीआणि संजय भाऊजी शेतात खपतही नव्हते. मालती वहिनींच्या माहेरी गरज नव्हती आणि   त्यांचे भाचर दर उन्हाळ्यात इथे असायचे.

माझ्या मनाची घुसमट दिवसेंदिवस वाढतच चालली होती.  बोलायला मन मोकळ करायला जागा नव्हतीदर महिन्यात चार दिवस वेगळ बसायची वेळ यायची. हे अतिशय कुचकट वागायचे बोलायचे त्या दिवसात. काम करणार्या बाई सारख ताट  एकदम सगळ वाढून खोलीत पाठवून दिल्या जायच. मला फार रडायला यायच. त्या चार दिवसात मी अजूनच एकलकोंडी व्हायची. त्यात आत्याबाईंचे कुत्सीत हसणारे डोळे. 

मग मी मनातल्या मनात सगळ्याना खूप बोलून घ्यायचे. अगदी दाजीना सुध्दाआणि सगळे खाली मान घालून माझ बोलण चुपचाप ऐकतात आहेत असही स्वप्न बघायचे. सगळे खजील असायचे. त्याना पश्चात्ताप झालेला असायचा. मला अस वागवल्या बद्दल ते खूप दिलगिर असायचेमग सगळे माझ्याशी चांगल वागायला लागायचे.

ह्या दिवा स्वप्नातल एक स्वप्न हे ही होत की मी मालती वहिनीनिंच्या कुशीत शिरून रडते आहे आणि त्या मला अगदी प्र्व्माने समजावतात आगे की नलिने शालेव्न्वव तुझ्याच मुली आहेत.


पण ह्या स्वगतातल एखाद वाक्य चुकूनहेव माझ्या तोंडून निघाल की घरात शितयुध्द सुरू व्हायच. वातावरण पार  बिनसून जायचदोघी मोठ्या जावा कट केल्यासारख्या मला एकट पाडायच्या. मी  अक्षम्य अपराध केल्या सारखी घरभर वावरायचे. कामाला हात लाऊ द्यायचा नाही. मोकळ बोलायच नाही. स्वत:हून कधी बोलायच नाही. मुलीना धाकत ठेवायच. वेळ आलीच तर बैठकीत विषय जायचा.

दाजींकडून मी फार अपेक्षा केली होती की त्यानी एकदा तरी माझी बाजू समजून घ्यावी आणि ती उचलुइन धरावी. पण कधीही त्यानी त्यांच्या अधिकाराचा वापर ह्या साठी केला नव्हता . मी म्हणेल ती पूर्वदिशा .. हा अलिखित नियम मालती वहिनी कसोशीने पुढे सरकवत होत्या.

Friday, 5 July 2019

#वाडाचिरेबंदी७


विद्या काकू (१) 

नलिनीची भेदरला क्गेहरा डोळ्यासमोरून हलत नव्हता तिला विचारल तुझ्या जवळ झोपू का तर मालती वहिनींचा चेहरा बदलला. तिनी पण आईचा कल बघून नको म्हंटल. 

असच व्हायच माझ पण सुरूवातीला. सतत ते डोळे पाठलाग करतात अस वाटायचअगदी रात्री सुध्दा ते आमच्यात आहेत अस वाटायच. सुखाने न्हाऊन निघतानाच्या क्षणी एक विचित्र परके पण माझ्या मनावर यायच. आणि मी त्या फोटोतल्या डोळ्यात हरवून जायचे.   आत्ता पर्यंत इतकी समरस असलेली बायको एकदम का आक्रसते म्हणून ह्याना चिड यायची. त्यानी विचारलही मला एकदा. मग दुसरा दिवस भर चिड चिड करायचे. वाट्टेल तसे अपमान करायचे. नवीन लग्न झालेल माझ मी फारच खजील व्हायचे. एकदा तर रात्री त्यानी मला तसच बाजुइला करून विचारल की माझ इतर कोणावर प्रेम आहे का? मी स्वप्नातही हा विचार करू शकत नव्हते.   त्या रात्री मी त्याना सांगायचा प्रयत्न केला की मला आत्याबाईंच्या डोळ्यांची भोती वाटते. 

आणि मग सुख हरवून गेल. हे पण एका ओझ्याखाली दबून जवळ यायचे. काळ पुढे सरकत गेला. वांझोटे पणाच दु:ख कायमच नशीबाला जुळलआणि ते डोळे हळू हळू आमच्या संसारातून दूर झाले. दिवस भर शेतात काबड कष्ट करून थकलेला नवरा रात्री जवळ येईनासा झाला. कधीतरी वहिनी मला वांझोटी म्हणाल्या... त्या रात्री रडत त्यांच्या कुशीत शिरायचे होते... तर त्यानी पण घाव घातला होता.

"बिज अंकुरायला माती सुपीक हवी न."

झाडाझुडूपांची काळजी घेणारा माणूस शेतीतल्या पिकांची मशागत करणारा माणूस एका क्षणात माझ्या मुळावर घाव घालून मोकळा झाला होता.

घरात आले तेंव्हा जेमतेम २० वर्षांच वय होत माझ. घरात सतत राबता. येणारा जाणारा पाहूणा कायमचाच. ऱोज निदान सहा सात पान जास्तीचे पडायचे पंगतीला. माझ्या माहेरी गरीबीइथे अमाप ऐश्वर्य. जमीनदार घराण. दाजी साहेब अतिशय दिलदार आणि लोकप्रिय व्यक्तीमत्वकुणीही आजवर त्यांच्या बद्दल चुकूनही वाईट बोललेल मी ऐकल नव्हत. 

मालती वहिनी माधव भाऊजी 
सुमती वहिनी आणि संजय भाऊजी.
मालती वहिनी मोठ्या असूनही सुमती वहिनींचा वरचष्मा मला जाणवायचा. घरातले कुठलेच काम आपली जवाबदारी म्हणून त्यानी स्विकारले नव्हते. सुमती वहिनी अतिशय धोरणी. प्रत्येक  गोष्टीत स्वत:च हित जपायच्या. आणि ते जपताना टोकाच्या स्वार्थी व्हायच्या. 

मालती वाहिनी घरातली जवाबदारी आणि मोठेपणाच्या ओझ्याखाली कायम पिचलेल्या. कोणी काही म्हणेल का? नाव ठेवतील का? ह्या धाकात चोवीस तास वावरायच्या. स्वत: ला फक्त चांगल सिध्द करायच्या प्रयत्नात भरपूर चुका करून स्वत:च्या आयुष्यातल छोट्या छोट्या गोष्टीतल सुखही घालवून बसलेल्या. मोठे पणाचा ताठा इतका की कोणी दुखावल जात आहे ह्याची त्याना पर्वा नसायचीत्यांच लग्न झाल तेंव्हा चार लहान दिर, कुळकुळाचार, सणवार, आला गेला पाहूणा प्रत्ये गोष्टीची जवाबदारी त्यानी अगदी लहान वयात समर्थ पणे पेलली होती. त्यामुळे दाजींची सगळी भिस्त त्यांच्यावर असायची.

माझ लग्न झाल तेंव्हा नलिनी शालीनी  लहान  लहान गोड मुली होत्यासुमती वहिनी गर्भारमुलीना साहजीकच  नवीन काकू  म्हणून माझ कौतूक. सतत मागे पुढे पिंगा घालायच्या. कितीदा रात्री जवळ झोपू दे चा हट्ट करायच्या. मग झोपल्या की माधव भाऊजी त्याना उचलून न्यायचे आमच्यातून. मी मुलीना जीव लावते म्हणून ह्याना फार आवडायच. 

 ते जीव लावण मग कायमचच झाल.   आमच मुल झालच नाही.

किती वर्ष दोघींची शाळेची तयारी, वेण्या घालून देण शाळेत सोडण हे काम मी आपल्या मनाने स्वत:कडे घेतलेल होत. सुमती  वहिनी पहीलटकरीण म्हणून बाळंतपणाला माहेरी गेल्या. त्याना प्रदीप झाला. तो लहानपणापासूनच अतिशय डांबरट होता. मुल अशेच असतात ह्या नावाखाली त्याचा सगळा दांडगट पण  खपवून घेतल्या जायचा. 

हे अतिशय अबोल. माधव भाऊजी आणि दाजींसोबत शेतात जायचे.  संजय भाऊजीना अपंग म्हणून घरी दारी भरपूर सवलती मिळाल्या होत्या. गावतल्या सरकारी शाळेत मास्तर होते तेभरपूर पगार आणि शिकवण्या.  सुमती वहिनी भाऊजींच्या जेवणा पुरत्या स्वयंपाक घरात यायच्या. त्यांच माहेर मुंबई च. त्यामुळे ह्या भरल्या घरात , खेडेगावत जुळवून घेताना त्याना खूप जड गेल होत.



Sunday, 30 June 2019

वाडा चिरेबंदी ६


नलिनी ( ४) 

तळव्यातला खोबऱ्याचा तुकडा नको वाटत होता. पण विद्या काकूच प्रेम होत ते. मी तो पदराला पुसला आणि खाल्ला.

 दाजी समोरच्या ओसरीत बसून हिशोब करत होते. आज बैठकीत न बसता इथे का? आजचा शेतातला तोडा आणि मजुरीचा हिशोब शंकर आजोबा दाजीना सांगत होते. शंकर काका घरचेच होते. पण ते दिवाणजींच काम करायचे. 

आईने गरम दुधाचा पेला त्यांच्या समोर ठेवला.

      "सुनबाई , कशी सुरूय चिमणीच्या लग्नाची तयारी?"

     "सुरूय हो. ऱोज काही ना काही काम निपटवण सुरू आहे. आज भाजणी करतेय. उद्या रुखवताच्या करंज्या आणि चकल्या करून घेऊ. ग्रहमका नंतर चिवडा लाडू. तुम्हाला आणि काकीना म्हणल की इथे या.  ऐकत नाहीय तुम्ही.  आपल सामान बांधा आणि या इथे.  मी काकीना ही  सांगितल होत. परत पाठवू का नलिनीच्या बाबाना? 

" अग नको नको. इथे यायला इतक्या उपचारांची गरज नाहीय. माझ्याच नातीच लग्न आहे. कसला मान पान? पण तुझ्या काकीच्या हातून कुठलच काम होत नाही. त्यामुळे तिला संकोच वाटतो आहे की लग्नघरी आपल्या मुळे खोळंबा व्हायला नको. तिचा कामासाठी उपयोग काहीच होणार नाही. "

    " कामाला कोणाला हव्या त्या? नुसत्या येऊन बसल्या तरी मला बळ येईल. मोठ बाई माणूस हव हो घरात कुणीतरी. एकटीने सतत मोठेपण घ्या.. मलाही लहान व्हाव वाटत न कुणी सल्ला दिला तर बर वाटत आपले पणानी.  फार भांबावल्या सारख  होत आहे मला. कुळाचारात काही चुकायला नको म्हणून जीव कासावीस होतो. पहील  लग्न आहे घरातल. ते ही मुलीच. खूप उलघाल होते मनाची. दाजी आहेत. पण पाठीवरून हात फिरवणार कोणी हव आहे हो. बाई माणसाचा वेगळाच आधार असतो."


इतकच बोलून आईच्या डोळ्याला धारा लागल्या. शंकर काकांच्या आणि  दाजींच्या पण डोळ्यात पाणी आल.  मला सारखी सारखी ही वातावरण निर्मीती नको होती. उरलेले दिवस आनंदात घालवायचे होते. ही शालीनी कुठे जाऊन बसली आज? 

परत वर जाऊन बसायची हिम्मत नव्हतीआत्या आजीक्गे डोळे आठवून पाठीतून सर्रकन कळ गेली. आज आई जवळ झोपू का?  पण ती दहा प्रश्न विचारेल. त्या पेक्षा खोलीत बर. 


    "वहिनी हे बघा न सारण शिजून झाल का?"

हो म्हणत आई आत गेली. इतके वर्ष झाले तरी विद्या काकूला हे समजत नसेल अस नाहीच. पण इतका साधा निर्णय घ्यायच स्वातंत्र्य तिला का देत नाही आई?   मला आईच्या बऱ्याच गोष्टी आवडत नाहीत.
आणि विद्या काकूच्या त्याहून.. मुल झाल नाही हा तिचा एकटीचा दोष असल्यासारखे वागतात सगळे. उद्या माझ्यावर वेळ आली तर? 

कसले अभद्र विचार सारखे मनात येतात आहेत आज? का रोमांचीत नाहीय मी? मला आठ दिवसानी स्वत: च्या घरी जायच आहे.  

     पुर्वेकडच्या  छोट्या सारातून शालीनी आली.  तिच्या हातात सामान होत. सगुणाने ते घेतल आणि आत आणल.

"काय आणल ग इतक?"


 "अग ताई  लाडू चिवडाचे पुडे आणि  रुखवताच्या सामानासाठी टोपल्या. 
आणि हे बघ... "


 तिनी स्वयंपाक घरात हळूच डोकावून पाहील. कोणी येणार नाही अश्या अंदाजानी तिच्या बॅग मधून एक क्रीम काढल आणि काही गोल पुंगळ्या.

आम्ही व्हरांड्याच्या पायरीवर बसलो. 

"हे काय आहे?"  मी तिला कुजबुजत  विचारल. 

" ह्याला कर्लर्स म्हणतात. ती सिमा नाही का तिची मोठी बहीण पार्लर चा किर्स करते आहे मुंबईत. तिला आणायला सांगितले होते मी."

" पण काय उपयोग ग ह्याचा?"

हे अशे केसाला लाऊन ठेवले न की केस कुरळे होतात.  तुला आवडतात न माझे कुरळे केस. "

"अग पण ते कसे वापरायचे?"

" तू कश्याला काळजी करते? मी शिकून आलीय तिच्याकडून."

" शाले, एक सांगू का?"

" हं! म्हणत शालीनी तिच्या वेणीशी खेळत होती. माझ्या आंदोलनांची तिला जाणीवच नव्हती.  मी विचार केला तिला सांगू की नको. काही समजत नव्हत.

ती गाण गुणगुणत पाय हलवत वेणीशी खेळत होती. 

मी  आतल्या आत भितीच काहूर दाबायचा प्रयत्न  करत होते. 

क्रमश: 

गायत्री ........
  


वाडा चिरेबंदी 
नलिनी ( ४) 

तळव्यातला खोबऱ्याचा तुकडा नको वाटत होता. पण विद्या काकूच प्रेम होत ते. मी तो पदराला पुसला आणि खाल्ला.

 दाजी समोरच्या ओसरीत बसून हिशोब करत होते. आज बैठकीत न बसता इथे का? आजचा शेतातला तोडा आणि मजुरीचा हिशोब शंकर आजोबा दाजीना सांगत होते. शंकर काका घरचेच होते. पण ते दिवाणजींच काम करायचे. 

आईने गरम दुधाचा पेला त्यांच्या समोर ठेवला.

      "सुनबाई , कशी सुरूय चिमणीच्या लग्नाची तयारी?"

     "सुरूय हो. ऱोज काही ना काही काम निपटवण सुरू आहे. आज भाजणी करतेय. उद्या रुखवताच्या करंज्या आणि चकल्या करून घेऊ. ग्रहमका नंतर चिवडा लाडू. तुम्हाला आणि काकीना म्हणल की इथे या.  ऐकत नाहीय तुम्ही.  आपल सामान बांधा आणि या इथे.  मी काकीना ही  सांगितल होत. परत पाठवू का नलिनीच्या बाबाना? 

" अग नको नको. इथे यायला इतक्या उपचारांची गरज नाहीय. माझ्याच नातीच लग्न आहे. कसला मान पान? पण तुझ्या काकीच्या हातून कुठलच काम होत नाही. त्यामुळे तिला संकोच वाटतो आहे की लग्नघरी आपल्या मुळे खोळंबा व्हायला नको. तिचा कामासाठी उपयोग काहीच होणार नाही. "

    " कामाला कोणाला हव्या त्या? नुसत्या येऊन बसल्या तरी मला बळ येईल. मोठ बाई माणूस हव हो घरात कुणीतरी. एकटीने सतत मोठेपण घ्या.. मलाही लहान व्हाव वाटत न कुणी सल्ला दिला तर बर वाटत आपले पणानी.  फार भांबावल्या सारख  होत आहे मला. कुळाचारात काही चुकायला नको म्हणून जीव कासावीस होतो. पहील  लग्न आहे घरातल. ते ही मुलीच. खूप उलघाल होते मनाची. दाजी आहेत. पण पाठीवरून हात फिरवणार कोणी हव आहे हो. बाई माणसाचा वेगळाच आधार असतो."


इतकच बोलून आईच्या डोळ्याला धारा लागल्या. शंकर काकांच्या आणि  दाजींच्या पण डोळ्यात पाणी आल.  मला सारखी सारखी ही वातावरण निर्मीती नको होती. उरलेले दिवस आनंदात घालवायचे होते. ही शालीनी कुठे जाऊन बसली आज? 

परत वर जाऊन बसायची हिम्मत नव्हतीआत्या आजीक्गे डोळे आठवून पाठीतून सर्रकन कळ गेली. आज आई जवळ झोपू का?  पण ती दहा प्रश्न विचारेल. त्या पेक्षा खोलीत बर. 


    "वहिनी हे बघा न सारण शिजून झाल का?"

हो म्हणत आई आत गेली. इतके वर्ष झाले तरी विद्या काकूला हे समजत नसेल अस नाहीच. पण इतका साधा निर्णय घ्यायच स्वातंत्र्य तिला का देत नाही आई?   मला आईच्या बऱ्याच गोष्टी आवडत नाहीत.
आणि विद्या काकूच्या त्याहून.. मुल झाल नाही हा तिचा एकटीचा दोष असल्यासारखे वागतात सगळे. उद्या माझ्यावर वेळ आली तर? 

कसले अभद्र विचार सारखे मनात येतात आहेत आज? का रोमांचीत नाहीय मी? मला आठ दिवसानी स्वत: च्या घरी जायच आहे.  

     पुर्वेकडच्या  छोट्या सारातून शालीनी आली.  तिच्या हातात सामान होत. सगुणाने ते घेतल आणि आत आणल.

"काय आणल ग इतक?"


 "अग ताई  लाडू चिवडाचे पुडे आणि  रुखवताच्या सामानासाठी टोपल्या. 
आणि हे बघ... "


 तिनी स्वयंपाक घरात हळूच डोकावून पाहील. कोणी येणार नाही अश्या अंदाजानी तिच्या बॅग मधून एक क्रीम काढल आणि काही गोल पुंगळ्या.

आम्ही व्हरांड्याच्या पायरीवर बसलो. 

"हे काय आहे?"  मी तिला कुजबुजत  विचारल. 

" ह्याला कर्लर्स म्हणतात. ती सिमा नाही का तिची मोठी बहीण पार्लर चा किर्स करते आहे मुंबईत. तिला आणायला सांगितले होते मी."

" पण काय उपयोग ग ह्याचा?"

हे अशे केसाला लाऊन ठेवले न की केस कुरळे होतात.  तुला आवडतात न माझे कुरळे केस. "

"अग पण ते कसे वापरायचे?"

" तू कश्याला काळजी करते? मी शिकून आलीय तिच्याकडून."

" शाले, एक सांगू का?"

" हं! म्हणत शालीनी तिच्या वेणीशी खेळत होती. माझ्या आंदोलनांची तिला जाणीवच नव्हती.  मी विचार केला तिला सांगू की नको. काही समजत नव्हत.

ती गाण गुणगुणत पाय हलवत वेणीशी खेळत होती. 

मी  आतल्या आत भितीच काहूर दाबायचा प्रयत्न  करत होते. 

क्रमश: 

गायत्री ........
  

#वाडाचिरेबंदी   १

ऱातकिड्यांची किरकिर खूपच जास्त ऐकू येत होती. पडवी शेजारी खाली गाद्या घालून सगळे झोपले होते. उन्हाळ्याचे दिवस होते .. अजून चंद्रोदय व्हायचा होता. घरात आक्रीत घडल होत. सगळे जागे होते तरी सगळे झोपल्याच सोंग घेऊन होते. दाजी, आक्का,   माई ,  दादासाहेब   आणि  दाजीचा मित्र शंकर सगळेच आपल्या जागी तळमळत होते. आयुष्याने भलतेच वळण घेतले होते.. आणि त्याला काही इलाज नव्हता.   मार्ग निघणार नव्हताच .. अब्रूचे लक्तर टांगल्या जाण्यापेक्षा मरण बर असा विचार आक्का च्या मनात हजारदा येऊन गेला.

               मिणमिणे कंदील खांबाला लटकत होते. काचेच्या पेटीच झुंबर होत. सगळ्या भिंतीना देवाच्या तसबिरी लागलेल्या होत्या.  एकीकडे टिळक , गोखले  आगरकरांच्या तसबिरी होत्या.  अंधार दाटला होता. कुठेतरी कुत्रे केकाटत होते
 वाड्याचा दरवाजा दोन्ही मोठ्याला कड्या घालून म्हादबाने मघाशीच बंद केला होता. आज जेवण म्हणजे नुसते anन चिवडले होते सगळ्यानीं. ह्या घराला आपल्या मुळे लागलेल ग्रहण कस सुटेल हे आक्का ला समजत नव्हते.  रडून रडूम तिचे डोळे लाल झाले होते. माई तिची समजूत काढायला कमी पडत होत्या . दादासाहेबांसमोर त्यांच काहीच चालत नसे. दाजी आक्का पेक्षा लहान तो काय बोलणार घरातल्या विषयात?

आक्का चुळबुळ करत होती. उठली ... माझघराजवळच्या खोलीत आली. तिथला कंदील उचलून तिनी आरश्यात  पाहीले.  वळून स्वत:ची पाठ पहायचा प्रयत्न केलां. पण अंधारात काही दिसेना.. तिने मुठी समोरच्या भिंतीवर आदळल्या. अतिशय असहाय्य होती ती.. तिचे जगण्यावर प्रेम होते. स्वत:च्या लांबसडक केसांवर प्रेम होते. गोऱ्या रंगावर प्रेम होते. आणि तिचे जगण्यावर प्रेम होते. आयुष्याकडून खूप स्वप्न होते तिचें. आणि ह्या सगळ्या स्वप्नाना दंश लागला होता भुजंगाचा. तिच आयुष्य विषवृक्ष बनत जात होते. त्याच्या फांद्या छाटल्या नाहीत तर तो अख्ख्या कुलकर्णी कुटुंबाला घातक ठरेल. एकुलता एक वारस असलेला दाजी ... त्याच लग्न होणार नाही. वंश वाढणार नाही. वंशवृक्ष खंडेल... त्यापेक्षा मुळापासून ही विषवल्ली कापायला हवी... मी संपायला हवे ... आक्काच्या मनात परत आत्महत्त्येचा विचार आला.  कंदीलातले तेल संपत आले होते. काच काळा व्हायला लागला. अंधार अजूनच गडद होत होता. रात्र किर्र कुरकुरतच होती.   आशेचा एकही किरण सापडत नव्हता.   काही तरी चमत्कार होईल आणि  आलेले संकट टळेल असा आक्का सतत विचार करत होती. पण अस काहीच झाल नाही. ह्या महिन्याभरात आज ताण जास्त वाढला होता. आणि आक्कानी निर्णय घेतला.

तिनी आपला पदर खोचला. जड अंत:करणाने एकेक पाऊल टाकत ती त्या खोलीबाहेर आली.. पडवीला डोळे फुटले अस तिला वाटलें. आठ डोळे ... तिची नजर बारीक झाली. तिनी वेध घेतला अंधाराचा ... कोणी तिला अडवायच्या आधी तिला जायचे होते. पण कोणीच अडवणार नाही हे पण माहीती होते.  डबडबलेले डोळे पुसत तिनी पडवीच्या दाराची कडी न वाजवता काढली.  कदाचीत आवज झाला ओअण पडवीला झोपेच्या सोंगातून बागेर निघायचे नव्हतें. तिच्या जिवाची लाही लाही झाली... तिला जगायचे होते.  तिनी कपाळावर बुक्क्या मारून घेतल्या .. हातातली बांगडी वाढली.. तिच्या कपाळाला लागली. खोच पडून रक्त यायला लागले

तिनी पडवीच दार बाहेरून लावून घेतल.. परसदारात आली... विहीरीकडे पहाताच पोटात सर्रकन गोळा आला. पण आता तिच्या इतकी सुरक्षीत जागा जगात कुठेच नाही हे तिला aअता पुरेपूर कळून चुकले होते. आजवर सुरक्षीत वाटणाऱ्या ह्या घरानी गेल्या काहीच दिवसात जीव नकोसा केला होता. ती विहीरीच्या पाळीवर बसली. आतला थंड अंधार तिच्या काळजात भितीची लहर सोडत होता.. त्यातून  कुणी आवाज देत आहे अस तिला वाटल... आसरा असतील का त्या?   उद्या मी नाहीशी झालेली दिसल्यावर हे घर किती हादरेल ह्या विचारने तिला असुरी आनंद झाला. असच तडफडेल हे सगळ घर.. ह्या माझ्याच घरानी माझ्याच माणसानी मला जीव नकोसा केला ... मला सुखात जगू दिल नाही सुखात मरू देत नाहीय... हे घर सुखी कस होईल?

ह्या विचाराना झटकायला तिनी मान झटकली.. जोरात झटक्याने तिचा तोल गेला... विहीरीच्या थंड अंधारात तिची किंचाळी भिनली...तिचे डोके भिंतीवर आदळले.. रक्ताचा फवारा उडाला. पाणी हातभर वर उसळले.   तिचा देह तळाशी जात होता.   पाण्याच्या धप्पकन्न आवाजा सोबत रातकिड्यांची किरकिर थांबली.

घरातल्या झोपेतल्या सोंगांनी जागच्या जागी हुंदके दिले... घर मुसमुसायला लागल.. जागच्या जागी तसच थिजून झोपेच सोंग वठवत राहील. सकाळ होणार होतीच ...

पण ती वेगळी असणार होती.

क्रमश:

गायत्री ..

..........................................................



#वाडाचिरेबंदी२

सकाळ झाली.  आक्का घरात नव्हती.  घराचे दार  आतून बंद होते.  तरी त्या झोपलेल्या पडवीने सहळ्या गावात आक्काचा शोध घेतला.  सगळे व्यवहार अगदी रोजसारखे सुरू होते.    पूर्ण दिवस गावभर शोधण्यात आणि विचारपुस करण्यात गेला...

     माई यंत्रवत उठल्या. निर्जीव डोळे.. सुन्न हालचाली. पुतळ्यासारखे स्तब्ध दादासाहेब आणि सैरभैर झालेला दाजी ... त्याच्या सोबत मुग गिळून बसलेला शंकर..

      स्नान संध्या ... पूजा सगळे आन्हीक यथासांग झाले. फक्त अन्न आजही वाट पहात होते. खांबाला  सुन्न  टेकून बसलेल्या माई एकटक समोरच्या दारातून दिसणाऱ्या विहीरीकडे बघत होत्या. 

संध्याकाळी  प्रेत फुगून वर आल. ओरडाआरड करत दादासाहेबानी गाव गोळा केल. शेजार पाजारचे लोक धावत आले. सगळ घर माणसानी गजबजल.. कुणीतरी विहीरीत उडी मारली तिघा चौघानी मिळून आक्का ला बाहेर काढल.. तिच प्रेत बाहेर आल्याबरोबर दादासाहेबानी  नी धावत जाऊन तिचा पदर तिच्या पाठीवरून पूर्ण झाकला. मग त्याना तिच फाटलेल डोक, वेदनेनी विदीर्ण झालेला चेहरा आणि सताड उघडे असलेले डोळे दिसले... त्यानी भेदरून किंकाळी फोडली. 

माई अजूनही खांबाला टेकूनच बसल्या होत्या. दाजी नी हंबरडा फोडला.. आक्काला वाचवता आल असत का? आपण का बांगड्या भरल्या सारखो चूप राहीलो?   त्यानी हातानी कपाळ बडवून घेतल.
 
        शेजारच्या काकूनी माईना खांद्याला हलवून हलवून शुध्दीवर आणल.. माईना संदर्भ लागेना. त्यांच्या जाणीवा जाग्याच होत नव्हत्या. 

      माई उठल्या ..   सगळ्याना वाटल त्या आक्काला कवटाळून आता धाय मोकलून रडतील. पण त्या देवघरात गेल्या तिथे उंबरठ्यावर बसून त्यानी आपल्या ओटीपोटात बुक्क्या मारून घेतल्या. डोळ्यातून टिपूस नव्हते.. आणि पापणी लवत नव्हती..

माईनी रडायला हव नाहीतर त्यांच्या मनावर परिणाम होईल अस काशीकाकू दाजी जवळ बोलल्या.  दाजी उठून माईंजवळ गेला. माईंच्या  खांद्याला हात लावला. माईनी अनोळखी नजरेनी त्याच्या कडे पाहील. 

दाजी चरकला. दोन पावल मागे सरकला. माई तितक्याच शांतपणे उठल्या आणि देवघरातून त्यानी देवीचा टाक उचलला... तो  घेऊन त्या आक्का जवळ गेल्या. आक्काच्या चेहऱ्याकडे एकही नजर न टाकता त्या विहिरीजवळ गेल्या. तो टाक त्यानी विहिरीत टाकला आणि आक्का जवळ येऊन बसल्या. एकही टिपूस त्यानी गाळल नाही.. तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाल्या सुखाने जा...

क्रमश:

गायत्री

.....................................................


#वाडाचिरेबंदी३

१:( नलिनी)

आठ दिवसांवर लग्न आलेले. घरात प्रत्येकाची धावपळ सुरू होती. येताजाता घरात तसाच मजूर माणसांचा राबता असायचा. पाहुणे यायला लागले होते.. प्रत्येक खोलीत लग्नाच्या साम्याच सामान पडलेल होत. कालच मावशी मामी आल्या. मामा उद्या तर मामे भावंड अगदी अदल्या दिवशी येणार होते. आज आईने मुहुर्त धरला. गावातल्या ११ सवाष्णी जेवायला घातल्या. मावशी मामी आई आणि दोघी काकू मिळून सुपात चुली घातल्या. मुगवड्या घातल्या. हळद कांडली. खल बत्त्याची पूजा केली. सवाष्णीना रितसर वस्त्र आणि वायन दिले. प्रत्येकीला पायाला हात लाऊन नमस्कार करायला सांगितला आईने आणि मी केलाही.. तोंडभरून आशीर्वाद मिळाले.

       आज अहेराच्या पुड्यांवर नाव टाकायचे होते. मी आमच्या म्हणजे माझ्या आणि शालिनी च्या खोलीत आले. साक्षगंधाच्या फोटोचा अलबम घेऊन पलंगावर बसले. खिडकीतून संध्याकाळचा सोनेरी प्रकाश येत होता.  बासुंदीचे जड जेवण केल्याने माझे डोळे लागत होते. पण वर येताना दिसल्या बरोबरच आईची सुचना झाली होती की तिन्हीसान्हेची झोपू नकोस. तरी डोळे लागतच होते.

       घरातल्या प्रत्येक खोलीत आत्त्याआजी आणि पद्माकाकूचा फोटो होता. आज त्या प्रत्येक खोलीतल्या फोटोला हार घातला होता. गंध फूल लाऊन पुजा केली होती. आत्या आजी तरूण पणीच गेली होती आणि पद्मा काकू म्हणे बाळंतपणात. तिच बाळ तिच्या माहेरीच होत. त्या फोटोंकडे पहाता पहाता मला अस जाणवल की आत्याआजी अगदी नजर खोचून पहाते आहे.  मला लग्न ठरल्या पासून हे सतत जाणवत होत. मला नेहनीच तिच्या डोळ्यात जिवंतपणा जाणवतो. पण आजकाल नजर बोचल्या सारखी होती. दाजी नेहमीच म्हणायचे की मी आक्का सारखी दिसते. आत्या आजीच लग्न का झाल नव्हत ते नाही माहीत पण ऐन लग्नाच्या वयात तिनी वाड्यातल्याच विहीरीत जीव दिला होता. घरात तिचा विषय कोणीच काढत नसे. आत्या आजी नंतर ह्या घरातली जन्माला आलेली मी मुलगी. मागची पूर्ण पिढी फक्त मुलच जन्माला आले होते. घरी येणार्या एखाद्या वयस्कर व्यक्ती कडून नकळत आक्का आणि दाजी असा विषय निघायचा तो ही क्वचीतच. माझ लग्न ठरल्या पासून दाजी मात्र खूपच काळजीत असल्या सारखे वाटायला लागले होते. बैठकीत असलेल्या आत्या आजीच्या फोटोकडे टक लाऊन बसलेले असायचे. कितीदा त्यांचे डोळे गढूळायचे. काय रहस्य होत ह्या सगळ्या मागे ते कळत नव्हत.. खूप काहीतरी ह्या वाड्याने आपल्या चिरेबंदी भिंतींमद्गे दडवल होत..

आत्या आजी नाहीशी झाल्यावर दिवस भर शोधाशोध केली. संध्याकाळी तिच फुगलेल प्रेत बागेर काढल. चाळीस फूट खोल विहीरीत तिने जीव दिला. ऱहाटाची बादली झप्पकन सुटली तर पाण्याचा किती मोठा आवाज होतो. मग आत्या आजी ने जीव दिला तर घराला जाग कशी नव्हती? घर का चिडीचूप होत? आणि अजूनही आहेच? काय लपवतात दाजी. कोणत रहस्य आत्या आजी सोबत ह्या विहिरीत दबल?  गावात रहाणारी जेमतेम अक्षर ओळख असलेली आत्या आजीबाहेर तर कुठेच जाण शक्य नव्हत. मग दिसेनाशी झाल्यावर घरातल्या विहीरीत कुणीच डोकावून पाहील नसेल?
दाजी किंव्हा त्याच्या आई बाबाना शंका नसेल आली?
जीव कोणी एका क्षणाच्या तिरीमिरीत नक्कीच देत नाही. आत्या आजीच्या मनात काय सुरू असेल तेंव्हा?
त्याच विहीरीच्या पाण्याने स्नान संध्या केली असेल. देव धुतले असतील. पाणी प्यायले असतील.
गावभर दबकत दबकत तिचा शोध घेतला असेल.  ती नाहीशी होणार ही खात्री होती का त्यांना?    प्रेत बाहेर आल्यावर सुतक पाळले असेल. गावभर तिच्या मरणाची चर्चा झाली असेलच न? कोणाला ना कोणाला नक्कीच माहीती असेल ह्या बद्दल. कुठेतरी नक्कीच पाणी मुरत.  तिचा आणि  काकूचा फोटो काय म्हणून प्रत्येक खोलीत? काका तर वेडसर आहे.त्याला काय फरक पडणार? हा देखावा कश्यासाठी?
      मी परत त्या दोघींचे फोटो पाहीले. आत्या आजी छद्मी हसते आहे अस मला वाटल. तिच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलतात अस मला नेहमी का वाटत? मला एकदम तिच्या चेहऱ्या कडे पहाण्याची भिती वाटायला लागली. पण माझी तिच्या डोळ्यात रुतलेली  नजर निघता निघत नव्हती. जणू एक सम्मोहन  मला खेचत होते..  अंगभर एक शिरशिरी मला भेदत होती.

क्रमश:

गायत्री


....................................................

#वाडाचिरेबंदी४

नलिनी (२)

सुन्न नजरेने खिळून ते फोटो मी बघत बसलेली असताना लहान काकू खोलीत आलेली मला कळालेच नाही. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी दचकले. मला खूप घाम सुटला होता. कावरा बावरा झालेला चेहरा पाहून ती घाबरली.
    " काय ग ए नले, काय झाल? कसला विचार करते आहेस? आणि फोटोत काय पहाते इतक टक लाऊन? तिन्ही सांजा होत आल्या अंधारात काय बसलीस? चल शिंपीण  आलीय तुझे ब्लाऊज घेऊन. ते घालून बघ."

     " अं .. हो .. काकू आत्या आजीने आत्महत्त्या का केली होती?"

धाडकन तिच्या अंगावर आदळलेला प्रश्न तिच्या मेंदू पर्यंत पोचायला काही सेकंद वेळ गेला. तिचा चेहरा अजूनच पडला.

         " का ग? भलत्या वेळेस कसले विचार करत बसलीस? आणि तुला काय करायचय?  आठ दिवसांवर लग्न आले. हे काय मुर्खासारखे विचार करत बसलीस? आधीच घर सोडून जायच्या विचाराने मन हळव झालेल असत. त्यात तिन्ही सांजेची एकटी बसलीस.  चल आधी खाली."

मी तिचा हात घट्ट धरला. भयंकर भिती माझ्या मनात दाटली होती. तळवा घामाने पचपचला होता. थरथरत होता.

         " काकू, आजी माझ्याकडे सतत रोखून बघते अस मला वाटत रहात.  तिचे डोळे सतत माझा पाठलाग करतात. त्यातही साक्षगंध झाल्या पासून जास्तच. दारात मांडव पडला तेंव्हा पासून अस वाटत की ती आस पास आहे.  मला  खूप...."

काकूनी माझ्या ओठावर बोट ठेवल. तिचा चेहरा खर्रकन उतरला. भेदरल्या नजरेनी तिनी आत्याआजीच्या फोटोकडे पाहील.  माझ्या चेहरा आपल्या पोटाशी घेतला. माझ्या केसातून हात फिरवत ती वक्रतुंड महाकाय पुटपुटायला लागली.

    ह्या काकूचा माझ्यावर विशेष जीव. तिला मुलबाळ झाल नाही. आतड्यातली सगळी माया आमच्या वर ओतलीं. त्यातही माझ्यात जास्त जीव अडकलेला. पण आईने तिला आमच्याशी जास्त जवळीकेनी कधी राहूच दिल नाही. घरात वाद खूप क्वचीत व्हायचे. पण एकदा रागाच्या भरात आई तिला वंझोटी म्हणून गेली होती.  आईला नंतर आपलीच चुक कळाली होती. पण मान्य केली नव्हती. काकूला कळत होत की तिच आमच्या जवळ जास्ती वावरण  आईला आवडत नाही. ती पण आजकाल अंतर ठेऊन माया उधळायची.

     मुकाट आपले काम करणारी ही काकू एखाद्याच वेळेस खूप चिडायची बोलायची. पण तिला संताप सुध्दा निट व्यक्त करता येत नव्हता. ती थरथर कापायची बोलताना. तिची बोबडी वळायची. आपल्याला काय म्हणायचे हे तिला कधीच सांगता आले नाही. आणि तिचा संताप व्यक्त झाल्या नंतर ओठ घट्ट मिटून घरभर वावरायची. कोणाशीच कधी मनमोकळ बोलताना मी तिला ऐकल नव्हत. लहाना काकासुध्दा स्वभावाने घुमट होता. त्या नवरा बायकोत सुध्दा कधी संवाद नसायचा.

       काकूच्या डोळ्यातून दोन थेंब ओघळले. माझ्या कपाळावर सांडले.

         "चल तिन्ही सांजेची ह्या नंतर खोलीत एकटी बसू नकोस. शालीनी कुठे गेलीय? तिला सांगाव लागेल सतत तुझ्या सोबत रहायला."

 तुटक तुटक  हे  वाक्य म्हणत आत्या आजीच्या चेहऱ्याकडे बघत तिनी माझ्या हाताला धरून मला दाराकडे आणल. दारामागे असलेले सगळे लाईटचे बटन तिनी सुरू करून दिले. दार ओढून घेतल. जणू आत्या आजीला तिथे कोंडल असा सुटकेचा भाव तिच्या चेहऱ्यावर आला. माझा हात धरून ती भराभरा जिना उतरायला लागली.

         जिना उतरल की मोकळ्या अंगणाचा चौक. त्या अंगणाच्या चारी बाजूनी खोल्या आणि चारी कोपऱ्यात जिने. वर तितक्याच खोल्या. पुर्वेच्या  बाजूनी  बाहेर जायचा दरवाजा. तिथून दहा बारा  फूट जागा सोडून वाड्याच्या भोवताल दगडी कुंपण. मागच्या बाजूला जनावरांचा गोठा आणि चारा. उजव्या बाजूला तिन चार लहान लहान  घर. घरातले गडी माणस तिथे रहायचे.

            पूर्वेच्या  दारालगत बैठकीचा सोपा. तिथे गाद्या त्यावर पांढर्या स्वच्छा चादरी;  भिंतीला टेकून तक्के; आणि एक डेस्क. त्याला कुलूप असायच आणि तिथे दाजी हिशोब  बघायचे फक्त.

 जिन्यातून उतरल्यावर एका कोपऱ्यात स्वयंपाक घर. त्याला लागून बायकांची उठाबसायची खोली.  घरात चुकूनच कधी निवांतपणा मिळाला की बायका त्या खोलीत आराम करायच्या. चौकात  इतक्यातच पांढऱ्या फरश्या बसवल्या. त्यामुळे पावसाळ्यातला चिख्खल कमी व्हायला लागला. वर्हांड्याला चारी बाजूने चार चार पायऱ्या. ज्याला घराची ठेवण माहीती असेल तिच व्यक्ती बरोबर हव त्या खोलीत जाऊ शकायची. नवीन व्यक्ती बिचकून जायची.

    बायकांच्या बैठकीत शिंपीण माझे ब्लाऊज घेऊन बसली होती. खरतर मला खूप इच्छा होती लग्नाचा बस्ता मुम्बई तून तयार करावा ब्लाऊज तिथे शिवावे पण घरून विरोध झाला आणि मी चूप बसले.

क्रमश:

गायत्री

................................................


#वाडाचिरेबंदी५

नलिनी  (३)

 संजय काका बाबांच्या पाठीवर पाय देऊन आला. त्याचा डावा पाय अधू होता. तो लंगडत चालायचा.त्यामुळे त्यांची झोपायची खोली खालीच होती. सुमती काकूने मला तिच्या खोलीत नेले ब्लाऊज घालून बघायला. सुमती काकू संजय काकाला दोन मुल.  प्रदीप आणि प्रज्ञा. त्यातही अख्ख्या पाच भावंडांच्या कुटूंबात तिला एकटीलाच मुलगा असल्याने ताठ्याने वागायची.तिने  प्रदिपला मुंबई ला ठेवल होत शिकायला. आणि प्रज्ञाला पण पाठवायच्या गोष्टी करायची. माझे साधे ब्लाऊज मला मुंबईला शिवू दिले नव्हते.  पण तिच्या ह्या विचाराला दाजी हो म्हणत नव्हते पण नकारही देत नव्हते. मी आणि शालीनी इथेच शिकलो ग्रॅज्युएट झालो. तेंव्हा दाजी म्हणाले होते की काय करायच मुलीच्या जातीला इतक शिकून?   रांधा वाढा उष्टी काढा. संसार करा तो वाढवा.  आणि हे ज्ञान बाईच्या जातीला उपजत असत. शिक्षणाने ते येत नाही. प्रदिपच्या नावाची खोली वर होती ती एकटी प्रज्ञा वापरायची.

      आत्या आजी  गेली तेंव्हा दाजी किती वर्षांचे असतील? मी आणि प्रदिप इतक अंतर असेल का? मला माझ्या जागी आत्या आजी जाणवायला लागली. मी एकटक त्या  ब्लाऊज कडे बघत होते.   सुमती काकूनी मला आवाज दिला. भानावर येत  मी ब्लाऊज घालून बघीतले. ब्लाऊज जरा घट्ट झाले.

      " तिला एकेक शिवण वाढवायला सांगावी लागेल. तसच तर लग्ना नंतर सगळा बदल शरीरात होतो.  आधीच तू जरा भरल्या अंगाची आहेस. नंतर त्रास होण्यापेक्षा जरा सैल करून माग"

         काकूच बोलण मला विचित्र वाटल. प्रज्ञा अतिशय रोड होती. मी ब्लाऊज घालून पहात असताना काकूची नजर माझ्या छातीकडे लागलेली मला जाणवली. तिच्या चेहऱ्यावर माझ्या बांध्याचा हिरस दिसत होता. आईला वांझोटी  विद्याकाकू  नकोशी व्हायची पण हिरसेल सुमती काकूशी मात्र ती कायम नमत घ्यायची.मी पटकन पदराने स्वत:ला झाकले. तिने नजर वळवली आणि एक सुस्कारा टाकला.  मी भराभरा ब्लाऊज च्या घड्या घातल्या.

    शिंपीण ब्लाऊज उद्या आणते सांगून गेली. मी स्वयंपाक घरात डोकावून बघितले. विद्याकाकू खाली मान घालून नारळ खवत होती. आणि आई भाजणी भाजत होती. खमंग वास सुटला होता घरभर.  मी पाट टाकून विद्या काकू जवळ बसले.

" बघितलेस का घालून? कसे बसले? कुठे ठेवलेस?" आईने विचारले.

" अग आई जरा तंग झाले.  तिला परत दिले सैल करायला."

" अग पण, आता केंव्हा आणेल ती? माया नव्हती का त्याला? घरच्या घरी  उसवता आली असती न शिवण. बॅगेत जायला हव आता एकेक सामान. आठ दिवस तर उरले."

   आई चा आवाज कातर झाला. डोळे डबडबले.  ह्या पंधरा दिवसात सतत असच होत होते.

" उद्या आणते आहे ती. मग मी आणि शालीनी मिळून व्यवस्थीत बॅग भरू. तू चिंता नको करू.. ए काकू दे ना ग एक तुकडा खोबऱ्याचा."

"  नाही नाही. उद्या चतुर्थी आहे न त्याची तयारी करतेय ती. ती मागते आणि तू देते काय?  इतके वर्षात तुला समजल नाही का की मोदकाच्या सारणाच खोबर उष्ट व्हायला नको म्हणून?  उद्या मोदक खा तू."

 काकूनी परत खाली मान घातली आणि खोबर खवायला लागली. तिच्या हाताबरोबर तिच्या बांगड्या मागे पुढे होत होत्या. त्याचा किणकिण आवाज होत होता. ती आई कडे चोरट्या नजरेनी बघत होती. आई आता वळून मागे बघणार नाही ही खात्री  झाल्यावर तिने खोबऱ्याचा एक तुकडा चटकन काढला आणि माझ्या हातात सरकवला. डोळ्यानी खूण केली बाहेर जाऊन खा म्हणून.

       " बाई नलिने उद्या मामा येईल.  आज मुहुर्त झाला. आता तू घराबाहेर पडू नकोस. ",,

       "अग पण आई,  मला माझ काही सामान आणायच राहील आहे न."

        "  असू दे शालीनीला सांग ती आणून देईल."

" अहो पण वहिनी  मुहुर्त झाला म्हणून काय झाल? अजून हळद लागायची आहे. देवदेवकाच कंकण बांधल की नका पडू देऊ तिला घराबाहेर."

" इतक काय सामान राहील आहे पण?"

" आहे न ग. थोड मेकअपच सामान आणि आतले कपडे वगैरे."

" हं जा. पण दिवसा उजेडी जा आणि लवकर परत ये. शालीनी सोबत जा. नाहीतर सुमती ला ने. तिला तशीही बाहेरच्या कामाताली चांगली समज आहे. मुम्बई ला जाऊन जाऊन वस्तु आणत रहाते तिलाच का नाही सांगितलस?"

" आई तू अतिरेकच करते सगळा. आतले घालायचे कपडे तिला आणायला सांगू का? आधीच तर ..."

मी वाक्य अर्धवट सोडून जीभ चावली.  आई मागे वळून माझ्याकडे बघत म्हणाली

" आधीच तर काय?"

" काही नाही."

मी तटकन विषय तोडला. कारण ती माझ्याकडे कशी पहाते हे सांगुनही आईला खर वाटल नसत. माझ्या तळव्यात खोबऱ्याचा तुकडा घामेजत होता.

" तू चलतेस का मग आई? नाहीतर विद्याकाकू तू चल."

" इथे कोण उजेड पाडेल मग? विद्याला नेल तर मला एकटीला  सुचत नाही. तुला शालीनी सोबत जायच आहे न जाऊन ये. "

मी उठून बाहेर आले. दाराशीच असताना  आईच वाक्य ऐकायला आल.

" विद्या, आत्त्याबाई नंतर जगलेली ही पहिली मुलगी आहे. दाजींच्या चारही मुली  रात्रीतून तडकाफडकी गेल्या. म्हणून हिच लग्न होई पर्यंत खूप जप  अस दाजीनी सांगितलेल आहे. तू काय फूस लावते तिला बाहेर जा म्हणून?"

मी स्तब्ध झाले. बाबाना बहिणी होत्या हे सुध्दा  मला आजच समजत होत. विद्या काकू नेहमीप्रमाणे  निमूट होती.  मला मघाच्या प्रसंगाचा विसर पडला होता. ते डोळे आठवून परत एक काटा सर्रकन अंगभर पसरला.

क्रमश:

गायत्री

Sunday, 9 August 2015

त्या दोघी.............

Edit · Delete
Gayatri S Muley
त्या दोघी..........
ऑफीस मधून परतताना अंधारल्या सारखे झाले दिवस इतक्यात लौकर मावळायला लागला होता.हवेत थोडा थंडावा सुध्दा आला होता.तसही दिवसभर एका खुर्चीत टेबल पुढे एका जागी बसून तिचे शरीर आंबल्या सारखे झाले होते.पाय अकडले होते.फक्त काही entries समजल्या नाही तर तिथून उठून साहेबाच्या केबीन पर्यंत 4 पावले चालणे इतकेच काय ती खुर्चीतून उठायची.दुपारी साहेब जेवायला घरी जायचे.त्यानी तिलाही म्हणले होते की तुला जायचे असल्यास तू जाऊ शकतेस.आणि एका तासात परत येवू शकतेस...सायकलने 5/7 मिनीटाचे अंतर होते ऑफीस ते घर.
पण एकतर घरी जाण्याची ओढ तिला वाटत नव्हती आणि मुख्य म्हणजे बॉस नसायाचा तो एक तास तिने गिरीशला फोन साठी दिला होता.त्याचा फोन येईल ह्या आशेने खुर्चीला खिळून बसायची.कितीच दुपारी अश्या ताटकळत वाट पहाण्यात गेल्या होत्या.हळू हळू दिवसागणीक ती निराश होत चालली होती.दुपार नंतर मग तिचे कामात लक्ष लागत नसे...चुका व्ह्यायच्या बॉस तसा शांत समंजस होता...लक्ष नसेल लागत तर चुका करण्यापेक्षा तुम्ही घरी जा असे त्याने तिला एकदोनदा सुचविले.त्यानंतर ती कसोशीने गिरीशचे विचार टाळायला लागली.
आज घरी जाताना त्याच्या मित्राकडे चौकशी करायची हे तिने मनाशी ठरविले.त्याच विचाराच्या तंद्रीत मित्राच्य दुकानापुढे येऊन उभी झाली.पण त्याला आत जाऊन काय विचारावे हे तिला सुचेना.उगाचच पायतले बळ गेल्या सारखे झाले.घश्याला कोरड पडली.ती घुटमळली...आणि जाऊ दे नको आत जायला ह्या विचाराने निघायला लागली तितक्यात दार उघडून गिरीशचा मित्र बाहेर आला.तिच्याकडे पाहून हसला.तिला लाजल्या सारखे झाले.उगाचच इथे रेंगाळलो असे वाटायला लागले.तोच स्वत: तिच्या जवळ आला."कशी आहेस?फोन नाही न आला गिरीशचा?"
ह्या प्रश्नाने तिच्या घश्यात आवंढा दाटला.
"हं . तुला आला का ?आला तर त्याला सांग मला फोन कर.मी वाट पहातेय ."
तिच्याकडे पहात तो फक्त हो म्हणाला.त्याने नेमके कश्याला हो म्हणले हे तिला समजले नाही.गिरीशचा फोन येऊन गेला का त्याला?मला का नाही केला मग त्याने ह्या विचाराने ती रडवेली झाली.तिच्या चेह-यावर हे सगळे विचार उमटले असावे...ते पाहून गिरीश म्हणाला." नाही आला मला.मिच करेल आज त्याला...झापतो चांगला..समजायला नको का त्याला तू वाट पहाते आहेस ते?आणि मी मुद्दाम त्याला सांगायला हवे का हे?इतका बेजवाबदार पणे कसा वागू शकतो तो?"
मित्राच्या ह्या बोलण्याने ती निरुत्तर झाली..पण जे मित्राला समजते ते गिरीशला समजू नये...ह्या विचाराने तिचा जीव घुसमटल्या सारखा झाला.मन चिरत गेला."तस नाही रे.काही कामात बिझी असेल तो.नवीन नौकरी आहे न ..आणि आमच्या साठीच करतोय न तो हे कष्ट..."
त्यावर त्याचा मित्र फक्त हसला.आपण त्याची समजूत काढतोय की स्वत:ची हेच तिला कळाले नाही.उद्या येते ह्या वेळेस असे त्याला सांगून ती पुढे निघाली..तेवढ्याने तिच्या मनाला आधार वाटला की निदान आपली तगमग गिरीश पर्यंत पोचती होईल.
घराकडे पावले उचलायला लागल्यावर तिला अजून उदासीनतेने घेरले.घरी कसे वातावरण असणार हे तिला पक्के माहीती होते.घराची अजीबात ओढ वाटत नव्हती.म्हणून गिरीशशी लग्न झाले की सुटका होईल असे तिला वाटत होते.
दारात आई पायरी वर बसली होती.तिने आईकडे पहायचे टाळले.अंगणात अंधार दाटत आला होता.बैठकीतल्या लाईटचा उजेड खिडकीतून अंगणात पडत होता.त्याने अंधार अजूनच गडद वाटत होता.बाकी खोल्यान्मधले दिवे बंद होते.तिला भूक लागली होती.चहा पण घ्यावा वाटत होता.शांतपणे थोडावेळ अंग टाकावे वाटत होते...मन शरीर दोन्ही थकले होते.पण ह्यावेळेस झोपणे म्हणजे रात्रीच्या झोपेचा बट्ट्याबोळ..आणि मग उद्या ऑफीस कामाचा विचका झाला असता.म्हणून झोप हा विचार बाजूला सारला तिने डोक्यातून.आईने चहा करून द्यावा ही अपेक्षा पण मनात आली नाही.ती आईला ओलांडत घरात आली.आतल्या खोल्या मधले दिवे लावले.बेसीन जवळ जाऊन थंड पाण्याचे सपकारे चेह-यावर मारले.थंडीने अंगावर शहारे आले पण तेवढ्याने तिला बरे वाटले.
गॅस वर स्वत:साठी चहा ठेवला.एक उपचार म्हणून आईला विचारले...".तू घेणार का चहा?" आईने तिच्याकडे वळून पहात म्हणले "नको.माझा झालाय.तुझ्यापुरतेच दुध आहे"
आता आईच्या चेहेर्याकडे तिचे लक्ष गेले.आईचे डोळे लालसर दिसत होते.चेहरा रडल्या सारखा वाटत होता.काय झाले असावे हा विचार तिच्या मनात आला.पण शब्दाने चौकशी करायची इच्छा झाली नाही.मनामनात आलेली अदृश्य भिंत तिला दूर करता येईना.आणि अहंकाराने ती करावीशी पण वाटत नव्हते.भिंत आईने उभी केलीय ती पाडेल.ती तिचीच जवाबदारी आहे....ह्या विचारानी तिला पुर्ण काबीज केले होते...भिंतीवर अजून एक मुलामा चढला.
तिने चहा गाळून घेतला.TV लावला.काहीतरी रटाळवाणा प्रॉग्राम सुरू होता.पण जरावेळात चित्रहार लागणार होता.म्हणून ती दटून बसली.तिला एकदम सगळ्या गोष्टींचा उबग आला.सगळ्या जगउबग आला.सगळ्या जगाची चिड आली.थोड्यावेळाने चित्रहार लागेल म्हणून रटाळ कार्यक्रम बघायचा...गिरीशचा फोन येईल म्हणून लंच टाईम जागचे न हलता घालवायचा.आई स्वत:च्या कोषातून बाहेर येईल म्हणून वाट पहायची...
तिला हे.नको असलेले वाट पहाणे लादून घेतले म्हणून अपमानाने रडायला यायला लागले.
घरात इनमीन दोन जणी.गिरीशशी लग्न झाले की ती सुटणार आणि आई पण सुटणार.हे असे का आणि केंव्हा सुरू झाले हे नेमके तिला आठवत नव्हते.पण आईत का आणि केंव्हा बदल झाला हे लक्षात यायला तिला खूप वेळ लागला कदाचीत.
दोघीच दोघी एकमेकीना.वडील तिला आठवत नव्हते इतक्या लहानपणी तिला आणि आईला टाकून गेले.कुणी नातेवाईक नाहीत.वडीलांविषयी कधी बोलणे नाही.तिनेही कधी आईला विचारले नाही.आणि आईने उणीव जाणवू दिली नव्हती.पण एक जिवंत जखम तिला आईच्या डोळ्यात सतत दिसायची.खूप ऐषो आरामात नाही पण समाधानात दोघी एकमेकींसाठी जगत होत्या.
गिरीश आयूष्यात आला आणि तिच भावविश्व बदलून गेले.का कोण जाणे आईला तो आवडला नव्हता.पण तिच्या इच्छे पुढे आईने हरकत घेतली नव्हती..त्याच्याकडे चांगली नौकरी ,पैसा नव्हता.तो काही दिवसानी दुसर्या गावी नौकरीला गेला.आणि मग काही दिवसानी लग्न करायचे असे त्यानी ठरवीले.गिरीश पत्रालाही क्वचीतच उत्तर द्यायचा.आणि तिला मुळातच भावनेच्या भरात वहात जायची सवय.
आधी इथे असताना गिरीश घरी यायचा.तेंव्हा ते दोघ तासंतास गप्पा करत बसायचे...बाहेर फिरायला जायचे...बाहेरून खाऊन यायचे.त्या क्षणांच्या आठवणीने तिला परत नर्व्हस वाटायला लागले.
मध्यंतरी आईच्या शाळेतले मास्तर काही कारणाने घरी आले.तेंव्हा ती गिरीश सोबत बाहेर गेलेली होती...घरी आली तेंव्हा आई आणि मास्तर बोलत बसले होते..आई हसत होती...आई बर्याच दिवसानी हसतेय हे तिला जाणवीले.
मग ते मास्तर अधून मधून यायला लागले...त्यांच येण जाण जास्त वाढलेय हे तिला लक्षात आले नाहे.कारण त्या दरम्यान गिरीशने तिचे अवघे विश्व व्यापून टाकले होते..त्या माणसाची आणि आईची घसट वाढतेय...आई स्वत:चे एक वेगळे जग निर्माण करू पहातेय हे तिला लक्षातच आले नाही.
गिरीश नौकरी निमित्य बाहेरगावी गेला आणि तिला ते जाणवायला लागले.कारण जेंव्हा तिला एकटे पडायची वेळ आली तेंव्हा आई मास्तर मधे वेळ घालवायला लागली होती .
ह्या क्षणी तिला प्रकर्षाने जाणवले ते आईचे एकटे पण .वडील सोडून गेल्यावर ज्या स्वाभीमानाने तिने आयुष्य फक्त आपल्या आधारावर काढले तो जाणवला.ती गिरीश मधे मग्न असताना आईची पोकळी अजून कशी वाढली असेल हे जाणवले.तो काळ कसा गेला असेल आईचा?हा विचार मनात आला.मग आईने तेंव्हा आधार शोधला मास्तरान्मधे तर काय बिघडले?पण ही जाणीव आपल्याला आज होतेय कारण गिरीशच्या वागण्याने मनात शंका निर्माण झालीय ह्या विचाराने खंत वाटली..अन आईचा कौल द्यायला लागले.त्या मास्तर पाई मायलेकीत भांडणे व्हायला सुरूवात झाली होती.तिला त्यांव्मच घरी येण आवडेनासे झाले.होते.आईला काय गर ह्या वयात असे वाटायचे ..
आज स्वत:वर वेळ आल्याने आईचा एकटेपणा जाणवत होता तो तेंव्हा का समजला नाही?त्या दोघी.....(2)
ऊठून बाहेर जाऊन आईला आवाज द्यावा असे तिला वाटले कपातला गार झालेला चहा तिने एका घोटात घश्या खाली घातला.तितक्यात चित्रहार सुरू झाला.तिने ते आईला कळावे म्हणून आवाज वढवीला आईला मुळात गाणे ऐकायची खूप आवड.पण आजकाल ती पण नाहीशी झालेली तिला जाणवली गाण्याचा आवाज ऐकून आई आत आली.दोन दाराच्या मधे खुर्ची टाकून त्यावर बसली.एक नजर TV कडे तर एक दाराकडे अशी होती.आईच्या मनात काय विचार चालू असतील हे तिला माहीती होते.
आपल्या नकळत्या वयात तरूण आईच्या भरवश्या वर टाकून आईला एकटे करणार्या वडीलांची तिला अतोनात चिड आली.आणि अचानक पणे त्या मास्तरचे आईच्या आयुष्यात महत्व का वाढले असावे हे तिला उमगले.मी लग्न करून जाण्या आधी कुणाच्या प्रेमात पडून इतकी व्यग्र झाली की आईला आलेले एकटेपण वाढतेय हे कळालेच नाही.जेंव्हा आपण सतत गिरीशसोबत असायचो.आई किती हवालदिल झाली असेल ह्या विचाराने ती आता हवालदील झाली.आपण आज ना उद्या आयुष्यात पुढे सरकणारच होतो.हा विचार करून आईने मास्तराचा आधार घेतला असेल तर काय बिघडले?
गिरीशने साधा फोन केला नाही तर आपण हताश होतो.सुन्न होतो.मग वडीलानी दिलेली जखम सांभाळत तिने आयुष्यभराचे एकटेपण एखाद्या व्यक्ती सोबत वाटून घ्यायचे ठरवीले तर काय बिघडले होते? आपण तमाशा केला .त्या दोघाना जवळ बसलेले पाहुन.त्या नंतर मास्तरानी येणे बंद केले.आणि आई आतल्या आत मिटून गेली.आईला शरीरसुखासाठी ह्या वयात एखाद्या पुरूषाला जवळ करावे वाटले हे तिला तेंव्हा पटलेच नव्हते.
आतल्या आत एक विज लक्खन चमकली..लाख लाख दिव्यांचा प्रकाश पडल्या सारखे झाले...ती आईची गरज होती.वर्षानूवर्षे आई त्यापासून वंचीत होती.आपण गिरीश सोबत निघून गेल्यावर आईला जगणे किती कठीण झाले असते?मग मनाची भूक भागविण्यासाठी तिने मास्तराना जवळ केले होते...मग जर शरीराचा पण विचार त्यात आला असेल तर काय गैर होते?आपण नाही का गिरीशचा आवेग स्विकारत?हवाच असतो न त्याचा स्पर्ष?
स्वत:चा स्वार्थ साधून गेलेले वडील , बेफीकीर वागणारा गिरीश , आणि अपमान झाला म्हणून निघून गेलेले मास्तर हे सगळे एकाच माळेचे मणी वाटले तिला.आईत आणि आपल्यात अखंड असलेला दुवा म्हणजे आपापले एकटेपण.तिला आतून घुसमटल्या सारखे व्हायला लागले.दोळे टचटच भरून यायला लागले.वडील आणि मास्तरांपेक्षा ही आपण आईच्या पदरात जास्त एकाकी पण बांधल्याचे तिला आतून जाणवीले.आईच्या पोकळीची भयानकता जाणवली.
ती नकळत उठली.आई जवळ गेली आईच्या खुर्चीजवळ खाली बसून तिने आईच्या मांडीत आपले डोके ठेवले.आईचा हात तिच्या केसातून फिरायला लागला.दोन टपोरे अश्रू तिच्या गालावर पडले.ती हमसून हमसून रडायला लागली.
उद्या ती गिरीशच्या फोन ची वाट पहाणार नव्हती
तिची आई उद्या पायरीवर बसणार नव्हती
.
.....सौ गायत्री मुळे
August 4 at 7:53am