Monday, 15 July 2019


दाजी (१) 

ती भयाण रात्र मागे टाकत आयुष्य पुढे सरकणार होतच आणि ते सरकल.  आज ह्या वळणावर , जेंव्हा ह्या कुळातल्या तिन पिढ्यातल्या मुलीच माझ्या पहिल्या वहिल्या नातीच लग्न आठ दिवसांवर येऊन ठेपलेल असताना माझ्या मनाच्या समाधानाचा पेला काठोकाठ का वहात नाहीय? माझे मुल सुना नातवंड एकत्र कुटुंबात आहेत. मी सुखी माणसाचा सदरा घालून वावरतो आहे. अजूनही व्यवहार माझ्याच हातात आहेत. माझ्याच मर्जीनी सगळ घडत आहे. तरी मन सतत धास्तवलेल आहे.  हे लग्न पार पडून नलूबाई आपल्या घरी गेल्या की एका शापातून हा चिरेबंदी वाडा मुक्त होणार होता.


आक्का काल स्वप्नात दिसली. भेसूर हसत होती. नलिनीच्या चेहऱ्याच्या जागी ती दिसत होती. हिरवा शालू नेसून हिरवा चुडा घालून तिनी विहिरीत उडी मारली. आक्काला अग्नी दिला पण अखेरपर्यंत तिच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही.  तिच्या मागोमाग माईनी जीव सोडला. आका गेल्यावर अक्षरश: माईनी खंगून खंगून जीव सोडला. शेवटचे आठ दिवस  तर पाण्याचा थेंब नाही. सतत कुठल्यातरी तंद्रीत असायची. खांबाला टेकून बसली रहायची. नंतर नंतर ती आक्काशी बोलायची. बोलता बोलता रडायची. फडाफडा गालात मारून घ्यायची. माफ कर लेकरा माफ कर लेकरा अशी बडबड करत तिनी त्या विहीरीकडे पहात खांबाजवळच जीव सोडला. आक्का  गेली. सव्वा महिन्यात  माई गेली आणि वाडा अनाथ झाला.  

आक्काच्या पिंडाला शेवटी दर्भाचा कावळा लावला. दादासाहेब अपराधी पणाच्या ओझ्याखाली वाचा हरवून बसले. त्या काळात मी कसा जगलो आणि आयुष्य पुढे सरकवल हे आठवल की आजही अंगावर काटा  येतो. 

जीवाचा नुसता थरकाप होतो. नलिनी खूप निरागस आहे. तिच्या आयुष्यात फक्त सुख दे देवा. आक्कानी काल स्वप्नात येवून मला डावा कौल दिला. मुंडावळ्या बांधलेली आक्का विहिरीतून बाहेर येतेय ... दरदरून  घाम सुटला आणि जाग आली. आठ दिवसांवर लग्न आलेल,आणि नलिनी मात्र उदासवाणी वाटली आज. लेकरू खूप संयमी  आहे. कुठेही उथळपणा नाही.  मोठ्यांच्या   इच्छेला सतत मान देते. तिची इच्छा होती मुंबईला जाऊन लग्नाची तयारी करायची. पण मी नाही म्हणल. तिला साक्षगंधानंतर  होणाऱ्या नवऱ्याला एकदा तरी भेटावस वाटल असेल. पण मी  नकार दिला. इतक्या पिढ्यात लग्नाला उभी झालेली ह्या कुळातली पहिली मुलगी. आणि तिच्या नंतर मुली जगल्या. त्यामुळे नलिनीच्या सुखाला कोणाचीच दृष्ट लागू नये म्हणून मी तिला तिच्या छोट्या छोट्या इच्छाना  सतत मोडता घालतो. मला वाटणारा आनंद आणि समाधान मी जराही चेहऱ्यावर दिसू देत नाही  ते केवळ नलिनी सुखी व्हावी म्हणून. एकदा ती लग्न होऊन ह्या घराबाहेर पडली की हा पूर्ण वाडा शापमुक्त होणार होता. 

 मला  झोप लागेना. मी  बाहेर आलो  चौकातला पाळणा हलतो आहे का अस मला  वाटल. कड्यांचा  कुचकुच आवाज कानात आला. मला  आजकाल कमी दिसायच. मी  डोळे बारीक करून पाहील. कोणीतरी तिथे बसलेल होत.


भितीचा गोळा पोटात आला माझ्या. मी थरथर कापत पाळण्या जवळ आलो. 

"कोण?"    खूप दुरून आल्यासारखा माझा आवाज आला.

ती विद्या होती. सटकन उभी झाली. 

" दाजी, मला झोप नव्हती लागत. म्हणून ..."

" अग पण मध्यरात्री अस बाहेर एकटीने येऊन बसायची काय गरज? "


" मला खोलीत घुसमटल्या सारख झाल आणि तिथे मला जास्त भिती वाटते."

" भिती? कश्याची?"


ती काही न बोलता  खाली मान घालून उभी राहीली.

" बर जा आता आत. उद्या परत लवकर उठायच आहे. मांडव पडेल बाहेर. पाहुणे येतील. आणि तू तर मालतीचा उजवा हात आहेस...  त्यातही   नलिनी च लग्न. तू नलिनीवर किती जीव लावलेला आहे ते माहीती आहे मला. नलिनीच लग्न ..."

माझा गळा भरून आला..

विद्या नी पण डोळे  पुसले. ती निघाली. जाताजाता थांबली.

" दाजी, आज नलिनी खूप घाबरली होती संध्याकाळी."

" का?" 

" तिला आत्त्याबाईंच्या डोळ्यांची भिती वाटते म्हणे.  मलाही ते डोळे सतत पाठलागावर असल्या सारखे वाटतात... म्हणून मला खोलीपेक्षा इथे बसायला बर वाटत."

 एका श्वासात  बोलून विद्या थांबली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्याची भिती वाटत होती ते समोर येऊन उभ झाल. 

" मी आत्ता तिच्या जवळ झोपायपा जाणार होते. पण वहिनीना आवडत नाही.. आणि तिला जाताना दु:ख व्हायला नको कसलच. "

माझ्या कानात काहीही शिरत नव्हत.. काहीतरी करायला हव होत. येणार गंडांतर टळायलाच हव होत. काय कराव मला काही कळत नव्हत.  

" दाजी, दाजी.. काय झाल? किती घाम सुटला तुम्हाला? चला आत तुम्ही आधी. मग मी जाते."

ह्या लेकरानी पण खूप जीव लावला होता. मूक पणे सेवा करत रहाणे जणू तिचा धर्म होता.

" मी जातो. तू झोप आता. मी ठिक आहे.

" दाजी , आत्त्याबाईनी आत्महत्त्या का केली होती? आणि नलिनीला त्या का दिसत असतील?"


तिच्या प्रश्नानी मी दचकलो. पण हा प्रश्न इतक्या उघडपणे पहिल्यांदाच मला कोणी विचारला होता. आणि आता त्याच उत्तर कदाचीत पुढे येणार होत. विनाशाच वादळ घोंघावत दारात येऊन उभ झालेल होत. 


क्रमश: 

गायत्री ...

Tuesday, 9 July 2019


विद्याकाकू (२)

मालती वहिनींच्या माहेरीपण असेच ऐश्वर्य. जमीन जुमला होत. त्या तिकडे पण मोठ्या आनि इकडे पण मोठ्या. मोठेपणाची आणि तो मिरवायची एक झिंग त्याना चढली होती. सगळ काही मि च करेल. स्वयंपाक घर चोवीस तास मिच सांभाळेल. आलागेला मिच पाहील. शेताच्या हिशोबात सुध्दा त्या बरीच ढवळाढवळ करायच्या. शेतमालाचा पैसा प्रत्यक्ष कोणाच्याच हाती येत नव्हता. दाजी, माधव भाऊजी आणि हे अस तिघ मिळून बॅंकेत अकाऊंट होते. तिघांच्या सहीशिवाय पैसा निघत नसे. आणि दाजीनी अजूनही कर्ते पण सोडलेले नव्हतेप्रत्येक गोष्ट त्यांच्या सल्ल्यानी आणि हिशोबानीच व्हायची. नलिनीच लग्न हा पूर्णपणे दाजींचाच निर्णय होता. मुलगा बघण्यापासून ते दागदागीने घडविण्या पर्यंत दाजींच्याच इच्छेला मान दिल्या गेला होता. माधव भाऊजी सतत काहीतरी विचारात असतात अस मला वाटत रहायच. मालती वहिनींचा फटकळ स्वभाव, दाजींची मार्जी सांभाळण मुलीच लग्न ठरल तरी निर्णयाचा अधिकार नसण ह्या गोष्टींचा ते विचार करतात का असा मी विचार करायची. 

ह्यांचा तर प्रश्नच नव्हता. त्याना काही मत असेल अस मला वाटतच नाहीअगदीच अबोल स्वभाव. घुमट पणाकडे  झुकणारा.  त्यात आम्हाला मुलबाळ न झाल्याने एक पडते पणाच सावट सतत आमच्यात असायच. मनावर ओझ घेऊन आम्ही वावरायचो. दोष कोणातच नव्हता पण आमचा योग नव्हता. ते स्वत: कधी खळखळून हसले नाही त्यामुळे हळूहळू मी पण हसण विसरत गेले. आणि आता हरवून बसले. बोलून बोलू तर कोणाशी? नलिनी शालिनेव अगदी काळजा जवळ पण वहिनीना आवडत नव्हत त्यानी जास्त काकू काकू केलेल. कधीतरी मला रागाच्या भरात वांझोटी म्हणून वहिनी मोकळ्या झाल्या होत्या. त्याना माझ मन किती दुखावल ह्याची जाणीव नसेल पण मी ह्या जन्मात ते विसरू शकणार नाहीय. आत्ताही टचकन डोळे भरून आले माझे.  आता नलिनीच लग्न होत आहे. उद्या जाऊन ह्या मुलींवर अशी वेळ आली तर? ह्या तिला वांझोटी म्हणून हिणवतील का? 


जागच्या जागी दचकले मी. मुलींसाठी माझ्या मनात असे विचार आलेच कसे?  मी फाडकन स्वत: च्या गालात मारून घेतल.


घरात धान्याच्या गोण्या येऊन पडायच्या.माझ माहेर यथातथा असूनही माहेरी जाताना कधी चार दाणे तू माहेरी नेतेस का असा प्रश्न इतके वर्षात एकदाही आला नव्हता.  पण सुमती वहिनी मात्र दरवेळेस धान्य न्यायच्या. वास्तवीक मुंबईत धान्य साठवायला जागा नसायचीआणि संजय भाऊजी शेतात खपतही नव्हते. मालती वहिनींच्या माहेरी गरज नव्हती आणि   त्यांचे भाचर दर उन्हाळ्यात इथे असायचे.

माझ्या मनाची घुसमट दिवसेंदिवस वाढतच चालली होती.  बोलायला मन मोकळ करायला जागा नव्हतीदर महिन्यात चार दिवस वेगळ बसायची वेळ यायची. हे अतिशय कुचकट वागायचे बोलायचे त्या दिवसात. काम करणार्या बाई सारख ताट  एकदम सगळ वाढून खोलीत पाठवून दिल्या जायच. मला फार रडायला यायच. त्या चार दिवसात मी अजूनच एकलकोंडी व्हायची. त्यात आत्याबाईंचे कुत्सीत हसणारे डोळे. 

मग मी मनातल्या मनात सगळ्याना खूप बोलून घ्यायचे. अगदी दाजीना सुध्दाआणि सगळे खाली मान घालून माझ बोलण चुपचाप ऐकतात आहेत असही स्वप्न बघायचे. सगळे खजील असायचे. त्याना पश्चात्ताप झालेला असायचा. मला अस वागवल्या बद्दल ते खूप दिलगिर असायचेमग सगळे माझ्याशी चांगल वागायला लागायचे.

ह्या दिवा स्वप्नातल एक स्वप्न हे ही होत की मी मालती वहिनीनिंच्या कुशीत शिरून रडते आहे आणि त्या मला अगदी प्र्व्माने समजावतात आगे की नलिने शालेव्न्वव तुझ्याच मुली आहेत.


पण ह्या स्वगतातल एखाद वाक्य चुकूनहेव माझ्या तोंडून निघाल की घरात शितयुध्द सुरू व्हायच. वातावरण पार  बिनसून जायचदोघी मोठ्या जावा कट केल्यासारख्या मला एकट पाडायच्या. मी  अक्षम्य अपराध केल्या सारखी घरभर वावरायचे. कामाला हात लाऊ द्यायचा नाही. मोकळ बोलायच नाही. स्वत:हून कधी बोलायच नाही. मुलीना धाकत ठेवायच. वेळ आलीच तर बैठकीत विषय जायचा.

दाजींकडून मी फार अपेक्षा केली होती की त्यानी एकदा तरी माझी बाजू समजून घ्यावी आणि ती उचलुइन धरावी. पण कधीही त्यानी त्यांच्या अधिकाराचा वापर ह्या साठी केला नव्हता . मी म्हणेल ती पूर्वदिशा .. हा अलिखित नियम मालती वहिनी कसोशीने पुढे सरकवत होत्या.

Friday, 5 July 2019

#वाडाचिरेबंदी७


विद्या काकू (१) 

नलिनीची भेदरला क्गेहरा डोळ्यासमोरून हलत नव्हता तिला विचारल तुझ्या जवळ झोपू का तर मालती वहिनींचा चेहरा बदलला. तिनी पण आईचा कल बघून नको म्हंटल. 

असच व्हायच माझ पण सुरूवातीला. सतत ते डोळे पाठलाग करतात अस वाटायचअगदी रात्री सुध्दा ते आमच्यात आहेत अस वाटायच. सुखाने न्हाऊन निघतानाच्या क्षणी एक विचित्र परके पण माझ्या मनावर यायच. आणि मी त्या फोटोतल्या डोळ्यात हरवून जायचे.   आत्ता पर्यंत इतकी समरस असलेली बायको एकदम का आक्रसते म्हणून ह्याना चिड यायची. त्यानी विचारलही मला एकदा. मग दुसरा दिवस भर चिड चिड करायचे. वाट्टेल तसे अपमान करायचे. नवीन लग्न झालेल माझ मी फारच खजील व्हायचे. एकदा तर रात्री त्यानी मला तसच बाजुइला करून विचारल की माझ इतर कोणावर प्रेम आहे का? मी स्वप्नातही हा विचार करू शकत नव्हते.   त्या रात्री मी त्याना सांगायचा प्रयत्न केला की मला आत्याबाईंच्या डोळ्यांची भोती वाटते. 

आणि मग सुख हरवून गेल. हे पण एका ओझ्याखाली दबून जवळ यायचे. काळ पुढे सरकत गेला. वांझोटे पणाच दु:ख कायमच नशीबाला जुळलआणि ते डोळे हळू हळू आमच्या संसारातून दूर झाले. दिवस भर शेतात काबड कष्ट करून थकलेला नवरा रात्री जवळ येईनासा झाला. कधीतरी वहिनी मला वांझोटी म्हणाल्या... त्या रात्री रडत त्यांच्या कुशीत शिरायचे होते... तर त्यानी पण घाव घातला होता.

"बिज अंकुरायला माती सुपीक हवी न."

झाडाझुडूपांची काळजी घेणारा माणूस शेतीतल्या पिकांची मशागत करणारा माणूस एका क्षणात माझ्या मुळावर घाव घालून मोकळा झाला होता.

घरात आले तेंव्हा जेमतेम २० वर्षांच वय होत माझ. घरात सतत राबता. येणारा जाणारा पाहूणा कायमचाच. ऱोज निदान सहा सात पान जास्तीचे पडायचे पंगतीला. माझ्या माहेरी गरीबीइथे अमाप ऐश्वर्य. जमीनदार घराण. दाजी साहेब अतिशय दिलदार आणि लोकप्रिय व्यक्तीमत्वकुणीही आजवर त्यांच्या बद्दल चुकूनही वाईट बोललेल मी ऐकल नव्हत. 

मालती वहिनी माधव भाऊजी 
सुमती वहिनी आणि संजय भाऊजी.
मालती वहिनी मोठ्या असूनही सुमती वहिनींचा वरचष्मा मला जाणवायचा. घरातले कुठलेच काम आपली जवाबदारी म्हणून त्यानी स्विकारले नव्हते. सुमती वहिनी अतिशय धोरणी. प्रत्येक  गोष्टीत स्वत:च हित जपायच्या. आणि ते जपताना टोकाच्या स्वार्थी व्हायच्या. 

मालती वाहिनी घरातली जवाबदारी आणि मोठेपणाच्या ओझ्याखाली कायम पिचलेल्या. कोणी काही म्हणेल का? नाव ठेवतील का? ह्या धाकात चोवीस तास वावरायच्या. स्वत: ला फक्त चांगल सिध्द करायच्या प्रयत्नात भरपूर चुका करून स्वत:च्या आयुष्यातल छोट्या छोट्या गोष्टीतल सुखही घालवून बसलेल्या. मोठे पणाचा ताठा इतका की कोणी दुखावल जात आहे ह्याची त्याना पर्वा नसायचीत्यांच लग्न झाल तेंव्हा चार लहान दिर, कुळकुळाचार, सणवार, आला गेला पाहूणा प्रत्ये गोष्टीची जवाबदारी त्यानी अगदी लहान वयात समर्थ पणे पेलली होती. त्यामुळे दाजींची सगळी भिस्त त्यांच्यावर असायची.

माझ लग्न झाल तेंव्हा नलिनी शालीनी  लहान  लहान गोड मुली होत्यासुमती वहिनी गर्भारमुलीना साहजीकच  नवीन काकू  म्हणून माझ कौतूक. सतत मागे पुढे पिंगा घालायच्या. कितीदा रात्री जवळ झोपू दे चा हट्ट करायच्या. मग झोपल्या की माधव भाऊजी त्याना उचलून न्यायचे आमच्यातून. मी मुलीना जीव लावते म्हणून ह्याना फार आवडायच. 

 ते जीव लावण मग कायमचच झाल.   आमच मुल झालच नाही.

किती वर्ष दोघींची शाळेची तयारी, वेण्या घालून देण शाळेत सोडण हे काम मी आपल्या मनाने स्वत:कडे घेतलेल होत. सुमती  वहिनी पहीलटकरीण म्हणून बाळंतपणाला माहेरी गेल्या. त्याना प्रदीप झाला. तो लहानपणापासूनच अतिशय डांबरट होता. मुल अशेच असतात ह्या नावाखाली त्याचा सगळा दांडगट पण  खपवून घेतल्या जायचा. 

हे अतिशय अबोल. माधव भाऊजी आणि दाजींसोबत शेतात जायचे.  संजय भाऊजीना अपंग म्हणून घरी दारी भरपूर सवलती मिळाल्या होत्या. गावतल्या सरकारी शाळेत मास्तर होते तेभरपूर पगार आणि शिकवण्या.  सुमती वहिनी भाऊजींच्या जेवणा पुरत्या स्वयंपाक घरात यायच्या. त्यांच माहेर मुंबई च. त्यामुळे ह्या भरल्या घरात , खेडेगावत जुळवून घेताना त्याना खूप जड गेल होत.